मराठी बातम्या /बातम्या /religion /भारतातील असं मंदिर जिथं लाल तिखटानं करतात अभिषेक; निरोगी आरोग्याची होते कामना

भारतातील असं मंदिर जिथं लाल तिखटानं करतात अभिषेक; निरोगी आरोग्याची होते कामना

जगातील एकमेव असे मंदिर जिथे लाल तिखटाने करतात अभिषेक, जळत्या निखाऱ्यांवर चालतात भाविक

जगातील एकमेव असे मंदिर जिथे लाल तिखटाने करतात अभिषेक, जळत्या निखाऱ्यांवर चालतात भाविक

जगातील एकमेव असे मंदिर जिथे लाल तिखटाने करतात अभिषेक, जळत्या निखाऱ्यांवर चालतात भाविक

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई ,04 फेब्रुवारी : भारतात अनेक विचित्र परंपरा आहेत, ज्या ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटते. भारतात देवीदेवतांची कोट्यवधी मंदिरे आहेत आणि या मंदिरांची स्वतःची वेगळी परंपरा आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये एक असे मंदिर आहे, जिथे लाल तिखटाने अभिषेक केला जातो. हे ऐकायला विचित्र वाटतं पण हे खरं आहे.

दरवर्षी असा उत्सव वारणा मुथु मरियम्मन मंदिरात 8 दिवस साजरा केला जातो, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक लाल तिखटाचा अभिषेक पाहण्यासाठी पोहोचतात. या सणात लोक निरोगी राहण्याच्या इच्छेने येतात आणि लाल तिखटाने अंघोळ करतात.

मंदिराच्या प्राचीन परंपरेनुसार येथील तीन ज्येष्ठ व्यक्ती हातात बांगड्या घालून दिवसभर उपवास करतात. यानंतर त्याचे मुंडण केले जाते. पुजारी त्यांना देवताप्रमाणे बसवून त्यांची पूजा करतात. त्यांना वेगवेगळ्या साहित्याने अभिषेक केला जातो. त्यात चंदन, कुस्करलेली फुले इ. या सगळ्यानंतर मिरचीचा अभिषेक होतो. तिघांनाही मिरचीची पूड घालून अंघोळ घातली जाते, पण अंघोळीपूर्वी त्यांना तिखट खायलाही दिले जाते.

एवढेच नाही, तर यानंतर त्यांना कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ घालून मंदिरात आणले जाते. येथे त्यांना जळत्या निखाऱ्यांवर चालावे लागते. सुमारे 85 वर्षांपासून ही परंपरा मंदिरात पाळली जात आहे. असे म्हणतात की, 1930 मध्ये देवाने स्वतः हरिश्रीनिवासन नावाच्या व्यक्तीला दर्शन दिले आणि लोकांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी ही परंपरा पाळण्यास सांगितले, तेव्हापासून या मंदिरात ही परंपरा पाळली जात आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Famous temples, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion, Tamilnadu