मुंबई, 3 डिसेंबर : अंतराळातील (Space) परिस्थिती पृथ्वीपेक्षा खूप वेगळी आहे. दोन ठिकाणांमधील फरकाबद्दल लोकांच्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे हवेची अनुपस्थिती. पण शास्त्रज्ञांच्या मनात गुरुत्वाकर्षण प्रथम येतं. पृथ्वीवरील जवळजवळ सर्व प्रक्रिया अशा आहेत ज्या गुरुत्वाकर्षणावर (Gravity) अवलंबून आहेत, ज्यात वनस्पतींची वाढ आणि विकास समाविष्ट आहे. याशिवाय अनेक अटींमुळे अंतराळात शेती (Farming in Space) करणे अवघड काम आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) शेतीचे प्रयोग यशस्वीपणे केले जात आहेत. एका नव्या प्रयत्नात शास्त्रज्ञांनी तिथं मिरचीचे पीक घेतले आहे.
सुरुवातीपासून प्रयोग
1997 पासून ISS अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे अनेक प्रयोग एकापाठोपाठ एक केले गेले, ज्यामध्ये अशा परिस्थितीत कृषी प्रयोग देखील महत्त्वाचा होता. पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असलेल्या वनस्पतींमध्ये त्या प्रक्रिया केव्हा सक्रिय होतील हे शास्त्रज्ञांसमोरील सर्वात मोठं आव्हान होतं. आता, 20 वर्षांहून अधिक प्रयोगांनंतर, वैज्ञानिक असे म्हणू शकतात की ते सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत अंतराळात पिके घेऊ शकतात.
नवीन विक्रम प्रस्थापित केला
ISS वर असलेल्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच मिरचीचं दुसरं पीक घेतले आहे, जो आतापर्यंतचा दीर्घ कालावधीचा वनस्पती प्रयोग होता. उड्डाण अभियंता मार्क वेंडे हेई यांनी स्टेशनच्या अॅडव्हान्स्ड प्लांट हॅबिटॅट (APH) मध्ये चार रोपे वाढवून 26 मिरचीचे नमुने मिळवले आहेत. हेईने अंतराळवीरांनी अंतराळात घेतलेल्या सर्वात लांब काळाच्या पिकाचा विक्रम मोडला.
Wedding in Space : आता थेट अवकाशातच बांधा लग्नगाठ; अंतराळातही करता येणार विवाह सोहळा
एक प्रमुख पीक
ज्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हे पीक घेतले होते त्यावरील कृषी-आधारित प्रयोगांमध्ये प्लांट हॅबिटॅट-04 किंवा पीएच-04 हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या अधिवासाचे प्रमुख अन्वेषक मॅट रोमेन यांनी सांगितले की, या अधिवासाने अंतराळात पीक उत्पादनाची कला पुढे नेण्याचे काम केलं आहे. या प्रयोगात त्यांनी न्यू मेक्सिकोमधील एका शेतातून मिर्ची घेतली आणि स्पेस स्टेशनच्या आत याचं पीक घेतलं.
या पिकाची लागवड कधी झाली?
यावर्षी जूनमध्ये हा प्रयोग सुरू झाला. या बियांची लागवड 12 जुलै रोजी अंतराळ अधिवासात करण्यात आली होती, नासाचे म्हणणे आहे की शास्त्रज्ञांनी हे पीक वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली. मायक्रोवेव्ह ओव्हनच्या जागी ही चार रोपे वाढवण्यात आली. जिथं अवकाश शास्त्रज्ञांनी या प्रयोगाच्या संपूर्ण वातावरणावर बारीक नजर ठेवली आणि त्यांच्या अधिवासात जमिनीसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.
पहिलं पीक कधी काढलं गेलं?
संशोधकांचे म्हणणे आहे की काही आठवड्यांतच झाडे फुलू लागली, परागकण पसरवण्यासाठी टिमने पंख्यांचा वेगवेगळ्या पद्धीतने वापर केला. याशिवाय शास्त्रज्ञांनी स्वतःच्या हाताने काही परागकण किंवा परागीकरणही केलं. 29 ऑक्टोबर रोजी पहिले पीक घेण्यात आले. इतकंच नाही तर शास्त्रज्ञांनी अंतराळात बनवलेल्या मेक्सिकन डिश टॅकोचाही आस्वाद घेतला, ज्यामध्ये अंतराळात उगवलेली मिरची टाकण्यात आली होती.
Sex in the space : Astronauts अंतराळात सेक्स करतात का?
अपेक्षेपेक्षा चवदार
दुसऱ्या कापणीत हेईने पृथ्वीवर परत आणण्यासाठी 12 मिर्च्या तयार केल्या. रोमेनने सांगितले की फर्स्ट हार्वेस्ट आणि स्पेस टॅकोचा उत्साह त्याच्यामध्ये आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये खूप जास्त होता. टॅको इतके स्वादिष्ट बनतील अशी त्यांची अपेक्षा नव्हती. कारण प्रत्येकाला मिर्चीवरील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाबद्दल पूर्णपणे माहिती नव्हती.
पीएच 4 च्या यशानंतर आता शास्त्रज्ञ अधिक खाण्यायोग्य पिके घेण्याचे काम करतील. या पर्वात टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्यांची संख्या येत आहे, त्यात काही छोट्या हिरव्या पालेभाज्यांची नावेही आहेत. याशिवाय कापूस पिकवण्याचीही नासाची योजना आहे. अंतराळातील शेती दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकते
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Organic farming, Space Centre, अंतराळ