मुंबई, 24 सप्टेंबर : पृथ्वीवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी अंतराळात (Space) एकदमच वेगळ्या वाटतात. चालणं, खाणं, पिणं अशा कित्येक सामान्य क्रिया करण्यासाठी अंतराळवीरांना (Astronauts) वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती आणि हवा उपलब्ध नसल्यामुळे, सर्व काही अधांतरी तरंगत असतं. सध्या मानव मंगळावर वस्ती करण्याची स्वप्नं बघत असताना, पृथ्वीवर करू शकणाऱ्या सर्वच गोष्टी अंतराळातही सहजपणे करता येतात का हा प्रश्न सर्वांनाच पडतो आहे. यातच मग मानवाचं बेसिक इन्स्टिंक्ट असणाऱ्या प्रजननाचाही समावेश आहे. अंतराळात असताना भूक, तहान, झोप अशा इच्छा तर आपण पूर्ण करू शकतो; पण सेक्स (Sex in space) करण्याची इच्छा झाली तर?
जर्मन अंतराळवीर मथियास माउरर हे सहा महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहेत. या मोहीमेपूर्वी त्यांनी अंतराळासंबंधी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. पण, अंतराळात सेक्स करण्याची इच्छा झाल्यास (Do astronauts perform sex in space) काय करता, या प्रश्नावर तेही जरासे अडखळले.
DW डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, माउरर म्हणाले, “अंतराळात आम्ही आमच्या मोहीमेबाबत विचार करत असतो, त्यामुळे दुसरा कुठला विचार करत नाही. तसेच, आमच्या ट्रेनिंगमध्येही सेक्शुअलिटी (Sexuality and space) संबंधी कोणतीही गोष्ट नसेल,”
हे वाचा - कारमधील रोमान्स पडला भारी! भयंकर परिस्थितीत अडकलं कपल, गाडीबाहेर निघणं मुश्किल
अंतराळात कधी कोणी संभोग केला आहे का? (Sex in Space) असं विचारल्यानंतर कित्येक अंतराळवीर याबाबत उत्तर देण्यास टाळतात. नासाही (NASA) असं काही झालं नसल्याचं सांगते. अंतराळात जेवढे प्रयोग झाले आहेत, ते सगळे प्राण्यांवर करण्यात आले आहेत, माणसांवर नाही असं नासा ठणकावून सांगते. नासामधील सीनियर बायोएथिस्ट पॉल रूट वोल्पे यांचं मात्र याबाबत वेगळं मत आहे. ते म्हणतात, जर आपण जास्त काळासाठी अंतराळात राहण्याचा विचार गांभिर्याने करत असू, तर अंतराळातील सेक्शुएलिटीबाबत (Sexuality must in space) अधिक विचार करणं गरजेचं आहे.”
नासाचे माजी वरिष्ठ चिकित्सा सल्लागार सारालिन मार्क सांगतात, “मानवाच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी सेक्स किंवा हस्तमैथुन (Sex important for mental health) गरजेचं आहे. प्रोटेस्टमध्ये बॅक्टेरिया राहू नये म्हणून पुरूषांचं वीर्यस्खलन गरजेचं आहे. तसेच, सेक्सच्या माध्यमातून मिळणारा ऑर्गाझम, म्हणजेच अत्युच्च आनंद हा आपल्यावरील ताण आणि चिंता दूर करण्यास मदत करतो. अंतराळातील तणावपूर्ण वातावरणात, तर ताण दूर होण्यासाठी याची भरपूर मदत होऊ शकते.” एकंदरीत, नासाचे वरिष्ठ सल्लागार तर अंतराळवीरांना अवकाशात सेक्स करण्याची परवानगी असावी या विचाराचे आहेत.
अंतराळात कधी कोणी संभोग केला आहे का?
अधिकृतरित्या तर तसं काही झाल्याची नोंद नाही. पण दोन मोहिमा अशा आहेत, ज्यामध्ये असं काही झालं असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. यातली पहिली मोहीम 1982 मध्ये पार पडली. रशियाची अंतराळवीर स्वेतलाना सावित्सकाया या अंतराळात गेलेल्या दुसऱ्याच महिला. सोयूज टी-7 या अंतराळ मोहिमेत त्यांच्यासोबत दोन पुरूष अंतराळवीरही होते. स्त्री आणि पुरुष एकत्र अंतराळात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. जर्मन अंतराळवीर उलरिश वॉल्टर यांनी आपल्या पुस्तकात या मोहिमेतील डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे, की यौन संसर्गाबाबत विचार करूनच ही मोहीम आखण्यात आली होती.
हे वाचा - ही अशी कसली GF! स्वतःचे हातपाय बांधून BF ला दुसऱ्या महिलेसोबत करायला लावते सेक्स
यानंतर 1992 मधील एका मोहिमेमध्येही अंतराळवीरांनी सेक्स केल्याचं म्हटलं जातं. मार्क ली आणि जेन डेविस अशी या अंतराळवीरांची नावं आहेत. या दोघांची नासामध्येच भेट झाली होती. या मोहिमेच्या एका वर्षापूर्वीच या दोघांनी गुपचुप लगीनगाठ बांधली होती. त्यामुळं ही अंतराळ यात्रा ही त्यांच्यासाठी हनीमूनप्रमाणेच (Honeymoon in space) होती, असं म्हटलं जातं.
अंतराळात सेक्स करणं शक्य आहे का?
पण अंतराळात जर पृथ्वीपेक्षा वेगळं वातावरण आहे, आणि वेगळे भौतिक नियम आहेत, तर सेक्स करणं शक्य आहे का? खरं तर आपल्याला अंतराळाबाबत, आणि लैंगिकतेबाबतही अगदीच कमी माहिती आहे. आतापर्यंत अवकाशात जाऊन आलेल्या अंतराळवीरांनी सांगितलं, की स्पेसमधील मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये शरीरात बरेच हॉर्मोनल बदल होतात. यामुळे सेक्सची इच्छा कमी होऊन जाते. अर्थात, हे केवळ पुरूषांच्या बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत आणखी एक समज पसरला आहे, तो म्हणजे अंतराळात रक्ताभिसरणाच्या वेगळ्या पद्धतीमुळे तिथे इरेक्शन, (Space Boner) म्हणजेच लिंगाची ताठरता शक्य नाही. मात्र, असं काही नसल्याचं सारालिन मार्क या अंतराळवीराने सांगितलं. मायक्रोग्रॅव्हिटीचा ‘त्या’ गोष्टीवर परिणाम होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. महिलांच्या बाबतीत हे कसं काम करतं हे जाणून घेणं अवघड आहे. कारण एक तर अवकाशात जाणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण केवळ 11 टक्के आहे. त्यातही अंतराळात मासिक पाळी (Avoid periods in space missions) येऊ नये यासाठी कित्येक महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात. त्यामुळे त्यांच्यातील हॉर्मोनल बदल हा अंतराळात गेल्यामुळे आहे, की या गोळ्यांमुळे हे ओळखणं कठीण असतं.
यासोबतच, बॉडी क्लॉकमध्ये झालेला बदलही सेक्सची इच्छा कमी होण्यास कारणीभूत ठरतो. अर्थात, अंतराळात जास्त काळ राहिलं, आणि तिथल्या वातावरणाची सवय झाली, की पुन्हा कामेच्छा परत येऊ शकते, असं वॉल्टर या अंतराळवीराने सांगितलं.
या सगळ्या तर वैज्ञानिक गोष्टी झाल्या. आपण आधीही म्हटलं आहे की अंतराळात लैंगिक इच्छाशक्ती कशी काम करते हे आपल्याही पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे, जर कधी अंतराळात सेक्स करण्याची इच्छा आणि तयारी झालीच; तर कसं करता येईल? यावर वॉल्टरकडे उत्तर आहे, ते म्हणजे डॉल्फिन्स! समुद्रात डॉल्फिन्स (How does dolphins perform sex) ज्याप्रमाणे तिसऱ्या एका साथीदाराची मदत घेऊन सेक्स करतात, तसं अंतराळवीर करू शकतात; असं वॉल्टर म्हणतात. वोल्पे यांच्याकडे मात्र त्याहून चांगली संकल्पना आहे. अंतराळ स्थानकात एखादी गोष्ट एकाच ठिकाणी रहावी यासाठी वेल्क्रो वापरण्यात येते. याचाच वापर करुन एक पार्टनर भिंतीला चिटकून राहिल्यास, सेक्स करणं शक्य आहे असं ते सांगतात. ते मिश्किलपणे म्हणतात, “तुम्ही अंतराळात सेक्स करताय, त्यामुळं थोडं तरी क्रिएटिव्ह असायलाच हवं, नाही का?”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astronaut, Lifestyle, Sex education, Sexual health, Sexual wellness, अंतराळ