Home /News /explainer /

Ajit Doval Birthday : भारतीय जेम्स बाँड अजित डोवाल यांच्या मनात अजूनही आहे 'ती' वेदना!

Ajit Doval Birthday : भारतीय जेम्स बाँड अजित डोवाल यांच्या मनात अजूनही आहे 'ती' वेदना!

Ajit Doval Birthday Today : अजित डोवाल यांचा जन्म 20 जानेवारी 1945 रोजी पौडी गढवाल, उत्तराखंड येथे झाला. त्यांचे वडील जीएन डोवाल हे देखील भारतीय लष्करात अधिकारी होते. डोवाल यांचे प्रारंभिक शिक्षण राजस्थानमधील अजमेर येथील किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल (आता अजमेर मिलिटरी स्कूल) येथे झाले.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 जानेवारी : भारताचे जेम्स बाँड म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे. अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मानले जातात. अजित डोवाल यांच्या नावावर सर्जिकल स्ट्राइकपासून ते नागा शांती सामंजस्य, ऑपरेशन ब्लॅक थंडर ते भारतीय परिचारिकांना ISIS च्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढण्यापर्यंत अनेक कामगिरी आहेत. 77 वर्षीय डोभाल हे भारतीय पोलीस सेवेतील एकमेव निवृत्त अधिकारी आहेत ज्यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. डोवाल 1972 मध्ये RAW मध्ये सामील झाले अजित डोवाल यांचा जन्म 20 जानेवारी 1945 रोजी पौडी गढवाल, उत्तराखंड येथे झाला. त्यांचे वडील जीएन डोवाल हे देखील भारतीय लष्करात अधिकारी होते. डोवाल यांचे प्रारंभिक शिक्षण राजस्थानमधील अजमेर येथील किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल (आता अजमेर मिलिटरी स्कूल) येथे झाले. 1967 मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. केरळ केडरचे 1968 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डोवाल 1972 मध्ये रॉ या गुप्तचर संस्थेत रुजू झाले. त्यांनी 7 वर्षे पाकिस्तानमध्ये अंडर कव्हर एजंट म्हणूनही काम केले आहे. गोल्डन टेंपलच्या ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये महत्त्वाची भूमिका 1988 मध्ये अमृतरच्या रस्त्यावर एक तरुण रिक्षा चालवताना दिसला होता. तेव्हा या भागात जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा चांगलाच प्रभाव होता. खलिस्तानींना त्याच्यावर संशय होता. मात्र, त्या रिक्षाचालकाला 10 दिवसांच्या प्रयत्नांनंतर खात्री पटली की त्याला ISI ने खलिस्तानींना मदत करण्यासाठी पाठवले होते. रिक्षाचालक दुसरे कोणी नसून अजित डोवाल असल्याचे सांगितले जाते. डोवाल यांनी ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये फुटीरतावाद्यांची स्थिती आणि संख्या याबद्दल माहिती देऊन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. रेल्वेच्या इतिहासातील अशा घटना ज्यात ट्रेनची चावीच हरवली; वाचा पुढे काय घडलं कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तालिबानशी चर्चा इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे 1999 मध्ये अपहरण झाले होते. नंतर ते कंदहारला हलवण्यात आले. त्यावेळी अजित डोवाल यांनी तालिबानशी चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. रॉचे माजी प्रमुख एएस दुलत यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात डोभाल कंदहारमधून सतत त्यांच्या संपर्कात होते. डोभाल यांनीच अपहरणकर्त्यांना प्रवाशांना सोडण्यासाठी राजी केले. गोवा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना मोठा झटका डोवाल यांचे सर्वात मोठे दुखणं डोवाल म्हणतात की, भारताचा इतिहास पाहिल्यास परकीयांनी आपल्यावर काय केले याचे दुःख होत नाही. आम्ही त्यांच्याशी लढलो असतो. पण, आमचे सर्व लोकं सोबत लढली नाहीत, सर्वांनी साथ दिली नाही याचेच दुःख होते. आजही या देशात माझी ही भावना असल्याचे ते म्हणाले.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ajit doval, Pm modi

    पुढील बातम्या