मुंबई 1 जुलै: झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नुकताच सुरू झालेला रिॲलिटी शो ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Little champs) चांगलाच चर्चेत आहे. चिमुकल्या स्पर्धकांनी कार्यक्रमाची सुरुवातच अतिशय रंगतदार केली होती. तर आता दुसऱ्याच आठवड्यात शो मध्ये लोकसंगीताचा स्पेशल एपिसोड पाहायला मिळणार आहे . याशिवाय या लिटिल चॅम्प्सने सुंदर अशा वेशभूषाही केल्या आहेत. कोणी नऊवारी नेसली तर कोणी कोळी बनला. तर त्याचं अनुसरून सुंदर गाणी ते सादर करणार आहेत. परिक्षकही पारंपरिक वेशात दिसून येत आहे. यावेळी एका लिटील चॅम्पने ‘वसाड गावचा धनगर राजा’ हे गाणं सादर केलं. हा परफॉरमन्स पाहून मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishmpayan) अगदी भारावून गेलेली पाहायला मिळाली.
लहान स्पर्धकांचे गोड मंजुळ आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षकही फारच उत्सुक दिसत आहेत. कार्यक्रमाचे जज म्हणजेच पहिल्या पर्वाचे टॉप पाच स्पर्धक आता कार्यक्रमाचे जज बनले आहेत.
प्रसिद्ध गायिकेचं टॉपलेस Pregnancy शुट; जगभरात फोटोशूटची चर्चात्यांनाही या लिटिल चॅम्पसचे परफॉर्मन्स फारच आवडत आहेत. प्रेक्षकांचेही सुंदर परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा आठवडा विशेष रंगणार यात शंका नाही.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) करत आहे तर परीक्षक पंचरत्न कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन हे करत आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत हे परीक्षक होते. तर अभिनेत्री पल्लवी जोशी सूत्रसंचालन करत होती. आजही प्रेक्षकांच्या मनात त्या पहिल्या वहिल्या पर्वाची छबी आहे. तेव्हा हे पर्व कसं रंगणार पाहणं रंजक ठरेल.

)







