जगप्रसिद्ध रॅपर, गायिका कार्डी बी लवकरच आई होणार आहे. यानिमित्ताने तिने काही मॅटर्निटी फोटोशुट केले आहेत. तिच्या या फोटोंची चर्चा सध्या जगभरात होत आहे. पाहा तिचे हटके फोटो.
कार्डी बी ला आधी एक मुलगी देखील आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. मुलीसोबत तिने सुंदर फोटोशूट केलं आहे.
तिचा पती ऑफसेट हा देखील एक प्रसिद्ध रॅपर आहे. २०१७ मध्ये त्यांनी त्यांची रिलेशनशिप घोषित केली होती.
२०१३ साली तिचे अनेक गाण्यांचे तसेच वाइन्सचे व्हिडीओ व्हायरल झाले होते त्यानंतर तिला जगभरात प्रसिद्धी मिळू लागली.