Home /News /entertainment /

ओम थांबवणार लग्न? ‘येऊ कशी तशी नांदायला’मध्ये स्वीटू देणार प्रेमाची परीक्षा

ओम थांबवणार लग्न? ‘येऊ कशी तशी नांदायला’मध्ये स्वीटू देणार प्रेमाची परीक्षा

ओम (Om) आणि स्वीटू (Sweetu) दोघांनाही एकमेंकाप्रती असलेल्या प्रेमाची जाणीव झाली आहे. तर ओम ने स्वीटूवरचं प्रेम व्यक्त ही केलं आहे. पण स्वीटू मात्र आपल्या आईसाठी आपल्या भावनांना आवर घालत आहे.

  मुंबई 14 मे:  झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी नांदायला’ (Yeu Kashi Tashi mi Nandayla)  एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. ओम (Om) आणि स्वीटू (Sweetu) दोघांनाही एकमेंकाप्रती असलेल्या प्रेमाची जाणीव झाली आहे. तर ओम ने स्वीटूवरचं प्रेम व्यक्त ही केलं आहे. पण स्वीटू मात्र आपल्या आईसाठी आपल्या भावनांना आवर घालत आहे. तर आता स्वीटूच्या साखरपुड्याची घटीकाही जवळ आली आहे. दुसरीकडे ओमला स्वीटूचंही आपल्यावर प्रेम आहे पण ती व्यक्त करत नसल्याचं समजलंय. त्यामुळे तो आता चक्क अंबरनाथला राहायलाही गेला आहे. व स्वीटूचा साखरपुडा होईपर्यंत आपण इथेच राहणार असल्याचं तो म्हणतो.

  ‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप

  या दरम्यान तो स्वीटूला पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र नलू म्हणजेच स्वीटूची आई स्वीटूला ओम पासून दूर रहायला सांगत आहे. तेव्हा आता स्वीटू आणि ओमची खऱ्या अर्थाने प्रेमकहानी कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
  स्वीटूच्या घरच्यांनी धुर्त मोहीतशी स्वीटूचं लग्न ठरवलं आहे. तर पदोपदी तो स्वीटूला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. व स्वीटूच्या कुटुंबीयांनाही संकटात टाकत आहे. पण साळवी कुटुंब मात्र त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत आहेत. तर आता त्या दोघांचाही साखरपुडा होत आहे. पण काहीही झालं तरी माझ्याशीच लग्न करेन असं ओमने ठरवलं आहे.
  तेव्हा आता अंबरनाथला गेलेला  ओम स्वीटूला खरचं मुंबईला लग्न करून घेऊन येणार का? व मोहीत आणि स्वीटूचं लग्न मोडणार का?  हे येत्या 16 मे च्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या