मुंबई 14 मे**:** तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत टप्पू ही व्यक्तिरेखा साकारुन नावारुपास आलेल्या अभिनेता भव्य गांधी याच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन झालं. (coronavirus) जवळपास 10 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पतीच्या मृत्यूमुळं टप्पूच्या आईला जोरदार मानसिक धक्का बसला आहे. अद्याप ती या धक्क्यातून बाहेर आलेली नाही. तिनं आपल्या पतीच्या मृत्यूसाठी देशातील आरोग्य व्यवस्थेला जबाबदार धरलं आहे. पती आजारी असताना त्यांनी जवळपास 500 लोकांना फोन केले पण कोणीही त्य़ांना मदत केली नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत भव्यनं आपल्या आईच्या मानसिक स्थितीवर भाष्य केलं. तो म्हणाला, “खरं तर एक महिन्यापूर्वी माझे वडील आजारी पडले होते. मात्र उपचारासाठी आम्हाला रुग्णालयात बेड मिळत नव्हता. 10 दिवसांपूर्वी त्यांची तब्येत आणखी बिघडली. या काळात आम्ही कित्येक रुग्णालयात फोन केले. जवळपास 500 लोकांकडे आम्ही मदत मागितली परंतु आमच्या हाथी केवळ निराशाच आली. अन् जेव्हा वडिलांना रुग्णालयात भरती केलं तोपर्यंत उशीर झाला होता.” असा दुखद अनुभव त्यानं शेअर केला. 11 मे रोजी भव्यच्या वडिलांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या निधनामुळं भव्यला जोरदार मानसिक धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याच्या वडिलांना भावपुर्ण श्रद्धांजली दिली आहे. तारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक आज राज्यात 37,326 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले असून राज्यात आज 549 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. मुंबईत आज 1794 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 74 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 5,90,818 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारी 9 मे रोजी राज्यात एकूण 48 हजार 401 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा हा 60 हजार 226 एवढा आहे. राज्यात आजपर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 44 लाख 7 हजार 818 एवढी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.