मुंबई 2 जुलै: झी मराठी (Zee Marathi) वरील नेहमीच चर्चेत राहणारी आणि तितकीच लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’मध्ये (Devmanus) फार मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्य आरोपी देवी सिंगला (Devi Singh) आता आता एक जुळा भाऊ असल्याचं समोर आलं आहे . इतकचं नाही तर त्याने त्याचा खूनही केला आहे. पण दुसरीकडे आता डिम्पल (Dimple) पोलिसांच्या तावडीत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता पोलिस आणि वकील आर्या देशमुख यांना डिम्पलवर संशय आला आहे. व तुला सगळं काही माहीत असल्याचं आर्या डिम्पलला म्हणतेय. त्यामुळे डिम्पलची आता पळता भुई झाली आहे.
दरम्यान मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षकही चक्रावून गेले आहेत. देवी सिंग चा जन्म गरीब कुटुंबात झाला होता तर तर त्याला एक जुळा भाऊ देखील होता. पण त्याचा भाऊ फारच साधा असतो व त्याला एक चांगलं कुटुंब दत्तक घेत. तो डॉक्टर होतो त्याचं नाव अजितकुमार देव असतं. शिवाय जुळा असल्याने तो दिसायला हुबेहूब देवी सिंग सारखाच असतो अशी कथा त्याने डिम्पल ला सांगितली आहे.
देवी सिंगने अजितचा ही खूण केला आहे. व त्याचे सर्व कागदपत्र स्वतःकडे ठेवले आहेत. त्यामुळे आता कोर्टात देवी सिंग विरुद्ध पुरावे आर्या आणि दिव्या कसे सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
HBD: ‘टाईमपास’ची चंदा ते स्विटू; पाहा ठाण्याची अन्विता फलटणकर कशी झाली लोकप्रिय अभिनेत्रीआता डिम्पल खरच देवी सिंगच खरं रूप पोलिसांना आणि कोर्टाला सांगणार का की पुन्हा एकदा गुंगारा देणार हे ही पाहणं औत्सुक्याचं ठरेल.