अभिनेत्री अन्विता फलटणकरचा आज वाढदिवस. टाईमपास चित्रपटातील लहाणशी भूमिका ते मालिकेतील मुख्य अभिनेत्री, जाणून घ्या कसा होता अन्विताचा अभिनय प्रवास.
सरस्वती हायस्कूलमधून अन्विताने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. तर मुंबईतील डी.जी. रुपारेल महाविद्यालायातून तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं.
अन्विताला २०१४ साली आलेल्या सुपरहीट टाईमपास चित्रपटात लहाणशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण अन्विताने या संधीचं सोन करत लहाणशी भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहण्याजोगी केली. चंदा हे पात्र तिने साकारलं होतं.

नंतर ती गर्ल्स या चित्रपटातही दिसली. त्यातीलही तिची भूमिका हिट ठरली होती. तसेच छबीदार छबी हे गाणंही सुपरहीट ठरंल होत. अन्विताने त्यात तुफान डान्स केला होता.
अन्विता सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या झी मराठीवरील मालिकेत स्विटू हे पात्र साकारत आहे. अन्विताच्या या मालिकेने अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवली होती.