Home /News /entertainment /

डॉक्टर करणार आणखी एक खून? ‘देवमाणूस’मध्ये मायरा झाली किडनॅप

डॉक्टर करणार आणखी एक खून? ‘देवमाणूस’मध्ये मायरा झाली किडनॅप

डिम्पलने डॉक्टरला केलं जखमी, डॉक्टर करणार डिम्पलचा खून? तर डॉक्टरने चक्क मायरा म्हणजेच दिव्याच्या मुलीचचं अपहरण केलं आहे.

  मुंबई 10 एप्रिल – झी मराठी (zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus)  मध्ये नवा ट्विस्ट आला आहे. तर डॉक्टर आणि डिम्पलच्या युतीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मालिकेत आता वळण येण्याची शक्याता आहे. एसीपी दिव्या सिंग ला देवी सिंग विषयी काही पुरावे सापडले आहेत आणि त्यामुळे ते सगळे पुरावे सादर करून इन्स्पेक्टर चव्हानच्या केस मधून ती स्वत:ला निर्दोष मुक्त करण्याचा करते आहे. पण डॉक्टर मात्र वेळोवेळी सगळे पुरावे गायब करतोय. गेले अनेक दिवस दिव्या ही देवी सिंगचा शोध घेत आहे. आणि हळू हळू आता तिच्या हाती काही पुरावे लागले आहेत. पण त्यातील काही पुरावे डॉक्टरने गायब केले. पण तरीही दिव्याने हाती लागलेल्या गोष्टींमधून स्वत:ला वाचवलं. तर आता ती पुन्हा एकदा ड्युटीवर रुजू झाली. डॉक्टरने तिला भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला व केस सोडायला सांगितली होती. पण दिव्याने त्याच काहीही न ऐकता कामाला सुरुवात केली. आणि त्यामुळेच संतापलेल्या डॉक्टरने चक्क मायरा म्हणजेच दिव्याच्या मुलीचचं अपहरण केलं आहे.

  राखी सावंतनं दिली जान्हवी कपूरला टक्कर; ‘नदीयों पार’ गाण्यावर केला धम्माल डान्स

  अपहरण केल्यानंतर तो दिव्याला फोन करतो व आवाज बदलून मुलीला सोडणार नसल्याचं म्हणतो. पण ही गोष्ट डिम्पल ला समजल्यावर ती डॉक्टरवर फारच संतापली आहे. व आपण तुम्हाला मायला काहीही करु देणार नाही असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा डॉक्टर तिला अडवण्याचा प्रयत्न करतो पण डिम्पल ऐकत नाही. व ती डॉक्टरला ढकलून देते. त्यामुळे डॉक्टर आता जखमी झाला आहे.
  तेव्हा आता डॉक्टर आणि डिम्पल मध्ये फूट निर्माण होत आहे. त्यामुळे डिम्पल मुळे डॉक्टरचं पितळ उघडं पडणार की डॉक्टर आणखी एक खून करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. गेले अनेक दिवसांपासून मालिका प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. पण डॉक्टर अर्थातच देवी सिंग अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या