जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / राखी सावंतनं दिली जान्हवी कपूरला टक्कर; ‘नदीयों पार’ गाण्यावर केला धम्माल डान्स

राखी सावंतनं दिली जान्हवी कपूरला टक्कर; ‘नदीयों पार’ गाण्यावर केला धम्माल डान्स

राखी सावंतनं दिली जान्हवी कपूरला टक्कर; ‘नदीयों पार’ गाण्यावर केला धम्माल डान्स

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhavi Kapoor) ‘नदीयों पार’ (nadiyon par) या गाण्यावर राखीने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तर या गाण्यात तुलाच घ्यायला हवं होतं असं अनेकांनी म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल – विविध कारणांसाठी प्रसिद्धिझोतात येणारी अभिनेत्री तसेच ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi sawant) आता एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhavi Kapoor) ‘नदीयों पार’ (nadiyon par)  या गाण्यावर राखीने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला भरपूर कमेंट्स दिल्या आहेत. तर या गाण्यात तुलाच घ्यायला हवं होतं असं अनेकांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने एक कॅप्शन देखिल लिहिलं आहे. ‘हा व्हिडीओ माझ्या आवडत्या श्रीदेवींसाठी. त्यांना जान्हवी फार अभिमान वाटत असेल. जान्हवी ने खूप सुंदर डान्स केला’, ‘रुही’ (ruhi) चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देखिल दिल्या आहेत. (rakhi sawant shares video on nadiyon par)

जाहिरात

राखीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पण हा तिने प्रत्यक्षात डान्स केलेला नसून फेस ऍप (face app) च्या माध्यमातून तिने जान्हवीच्या जागेवर स्वत:चा चेहरा लावला आहे. याआधीही तिने असाच एक व्हिडीओ बनवला होता. ज्यात तिने अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या (Priyanka chopra) गाण्यावर डान्स केला होता अर्थातच प्रियंकाच्या चेहऱ्यावर तिने स्वत:चा चेहरा लावला होता.

पण नदीयों पार या गाण्यावरील व्हिडीओ तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. तर या गाण्यात जान्हवी ऐवजी तुलाच घ्यायला हवं होतं असं तिच्या चाहत्यांच  म्हणणं आहे

अब्जाधीश व्यवसायिकाला अभिनेत्रीचा नकार; मालिकेत काम करण्यासाठी मोडलं लग्न

राखी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फारच सक्रीय (active on social media) असते. नेहमीच निरनिराळे मजेशीर व्हिडीओ ती पोस्ट करत असते. काहीच दिवसांपूर्वी राखीचे इन्स्टाग्राम अकाउंटवर (instagaram acoount followers) 1 million  फॉलोवर्स पूर्ण झाले होते. त्यामुळे राखी चित्रपटांत किंवा मालिकांध्ये दिसत नसली तरीही तिचे भरपूर चाहते आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात