मुंबई 6 मे : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) मध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. डॉक्टर एका मागून एक पुरावे नष्ट करत आहे. तर दुसरीकडे एसीपी दिव्या सिंग (Divya singh) देवी सिंगचा (Devi singh) अर्थात डॉक्टरचा जंग जंग शोध घेत आहे. पण अजूनही तिला डॉक्टरचा खरा चेहरा समजला नाही. व डॉक्टर मात्र सगळे पुरावे संपवत आहे. तर आता त्याने दिव्याच्या हाती लागलेला शेवटचा पुरावाही नष्ट केला आहे. दिव्याला देवी सिंग आणि रुपा ज्या हॉटेल मध्ये थांबले होते. त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलाविषयी समजलेलं असतं. व त्या मुलाच्या मदतीने ती देवी सिंगला पकडण्याचा प्रयत्न करते. पण त्याआधीच डॉक्टरने त्या मुलाचा खात्मा केला आहे. तर यावेळी डॉक्टरने शक्कल लढवून त्याला जेवणातून एक विशिष्ठ प्रकारचं विष दिलं आहे. ज्यामुळे त्या मुलाला अटॅक येतो. व त्याचा मृत्यु होतो.
दिव्याच्या हातात देवी सिंगला पकडण्यासाठी हा शेवटचा महत्त्वाचा पुरावा लागला होता. पण तो ही नष्ट झाल्याने दिव्या फारच नाराज होते.पण तिने आता देवी सिंग ला पकडण्यासाठी नवा मास्टर प्लॅन करण्याचं ठरवलं आहे. व तो प्लॅन ती देवी सिंग ला अटक होईपर्यत कोणालाही सांगणार नाही. त्यामुळे दिव्याच्या डोक्यात नक्की काय शिजतय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
HBD: अद्वैत दादरकर कसा झाला बबड्या? पाहा अष्टपैलू अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवाससध्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे मालिकेचं शुटींग हे बेळगावात हलवण्यात आलं आहे. त्यामुळे गावातील वाडा आणि गाव ही कथा न दाखवता सगळेजन डॉक्टरने बांधलेल्या रिसॉर्टवर राहत आहेत, असं दाखण्यात येत आहे. तर डॉक्टरने डिम्पलशी लग्न करण्यास होकार दिल्याने संपूर्ण कुटुंबात आता लग्नाची तयारी देखिल सुरू झाली आहे. पण आता दिव्याच्या या नव्या प्लॅनमुळे डॉक्टर आता तरी गजाआड जाणार का? हे पाहणं म्हत्त्वाचं ठरेल.