मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: अद्वैत दादरकर कसा झाला बबड्या? पाहा अष्टपैलू अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवास

HBD: अद्वैत दादरकर कसा झाला बबड्या? पाहा अष्टपैलू अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवास

शिक्षण संपल्यानंतर अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला. नाटकापासूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली होती.

शिक्षण संपल्यानंतर अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला. नाटकापासूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली होती.

शिक्षण संपल्यानंतर अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला. नाटकापासूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली होती.

  • Published by:  News Digital

मुंबई 6 मे: अभिनेता, दिग्दर्शक अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar)  हा छोट्या पडद्यावरचा एक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. अगदी मोजक्या मालिकांमधूनच त्याने प्रेक्षकांच मन जिंकल. तर सध्या झी मराठीवरील ‘अग्गबाई सुनबाई’ (Aggabai Sunbai)  या मालिकेत तो सोहम (Soham) म्हणजेच बबड्या ही भूमिका साकारत आहे.

अद्वैत ने आजवर काही चित्रपट आणि मालिकांमध्येही काम काम केल आहे. पण पडद्यावरील कामापेक्षा पडद्यामागे त्याने जास्त काम केलं आहे. एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्याने अनेक मालिका, नाटकं आणि काही चित्रपटांच लेखन ही केलं आहे. आज अद्वैतचा वाढदिवस आहे. मुंबईतील दादरमध्ये त्याचा जन्म झाला होता. तर बालमोहन विद्यामंदीर या शाळेत त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झालं.

अद्वैत ला कॉलेज जीवनापासूनच नाटक, अभिनय, दिग्दर्शन या गोष्टींची आवड होती. डी. जी. रुपारेल माहाविद्यालायातून त्याने शिक्षण पूर्ण केलं होत. महाविद्यालयिन अनेक एकांकीका स्पर्धांमध्ये तो भाग घ्यायचा. त्यानंतर त्याने अनेक नाटकांच लेखन आणि दिग्दर्शन देखिल केलं. शिक्षण संपल्यानंतर अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला. नाटकापासूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली होती.

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘दादा एक गुडन्यूज आहे’, ‘बॅरिस्टर’, ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘वाह गुरू’, ‘मोरुची मावशी’ अशा अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर काही नाटकांच दिग्दर्शनही केलं आहे. पण अद्वैत ला मोठी ओळख मिळाली ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील भूमिकेमुळे. अद्वैत ने यात सौमित्र ही भूमिका साकारली होती. अतिशय उत्साही, बिनधास्त आणि कूल अशी ती व्यक्तिरेखा होती. तर प्रेक्षकांनाही हे पात्र फार आवडलं होतं, विशेष म्हणजे अद्वैत स्वत: या मालिकेचा पटकथा लेखक होता. तर सध्या तो अग्गबाई सुनबाई या मालिकेत सोहमच्या भूमिकेत झळकत आहे. यात तो विलन म्हणून काम करत आहे.

डॉक्टरांना चोर म्हणणं सुनील पालला पडलं भारी; अभिनेत्याविरोधात पोलीस तक्रार दाखल

अद्वैत ने त्याची दिर्घकाळ राहिलेली प्रेयसी अभिनेत्री भक्ति देसाई (Bhakti Desai) सोबत विवाह केला होता. तर त्यांना एक लहान मुलगी देखिल आहे. सोशल मीडियावर तो सक्रिय असतो. नेहमीच निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असतो.

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Tv serial, TV serials