मुंबई 7 जुलै: झी मराठी (Zee Marathi) वाहिनी वरील लोकप्रिय तसेच अतिशय चर्चेत राहणारी मालिका ‘देवमाणूस’मध्ये (Devmanus) सतत नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स येताना दिसत आहेत. तर जेलच्या आतही देवी सिंगची (Devi Singh) कारस्थानं सुरूच आहेत. ACP दिव्या सिंग आणि सरकारी वकील आर्या देशमुख हे देवी सिंगला फासावर लटकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. मात्र देवी सिंगच्या नवनवीन खेळी पुन्हा एकदा केसला कलाटणी देत आहेत. तर आता त्याने तोच डॉक्टर अजित कुमार देव असल्याचंही सिद्ध केलं आहे.
धक्कादायक! दिलीप कुमारांच्या निधनानंतर सायराबानू विषयी ‘हे’ केलं जातयं Searchदेवी सिंग आता नवी खेळी खेळत आहे. जेलमध्ये असणाऱ्या पोलिसांना तो पैसे चारून हाताशी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता त्याने मुख्य जेलर ला पैश्या च आमिष दाखवून जेल मध्येच एक इंटरव्ह्यू देण्याचं ठरवलं आहे. यातून तो लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
या इंटरव्ह्यू मधून तो स्वतःची करून कहाणी सांगून लोकांची सहानुभूती मिळवणार आहे. त्यामुळे ही केस आता कोणत वळण घेणार याकडे प्रेक्षकांचंही लक्ष लागला आहे.
वाड्यातील सगळे मात्र आता डॉक्टर सुटणार याचा आनंद व्यक्त करत आहेत. व डॉक्टरने काहीच केलं नाही असं सगळ्यांना वाटत आहे. सरू आजी सोडून सगळेचं डॉक्टरच्या बाजूने आहेत. दुसरीकडे दिव्या आणि आर्या पुरावे शोधत आहेत. पण देवी सिंगने काहीच पुरावे सोडले नाहीत. त्यामुळे आता देवी सिंगचा खरा चेहरा कधी समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

)







