मुंबई, 14 जून: आज वटपौर्णिमेचा
( VatPurnima) दिवस सगळ्या स्त्रियांसाठी खास आहे. इथे प्रत्येक जण सत्यवान आणि सावित्री
( Satyavan-savitri) आहेत. प्रत्येक सत्यवान सावित्रीची गोष्टही तितकीच निराळी आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या सावित्रीच्या येण्यानं त्यांचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं. असाच सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी
(Swapnil Joshi) एक अभिनेता म्हणून नावारुपाला येत असताना स्वप्निल जोशीच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. पण एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचं आयुष्य बदललं. ती व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी लीना
(Leena Joshi) आज वटपौर्णिमेनिमित्त स्वप्निलनं लीनाचं कौतुक करत तिचं त्याच्या आयुष्यातलं स्थान अधोरेखित केलंय.
सत्यवान सावित्रीची गोष्ट सर्वांना ऐकिवात आहे. पण नेमकी त्यांची प्रेमकथा काय होती याची सविस्तर गोष्ट सांगणारी 'सत्यवान सावित्री' ही नवी मालिका झी मराठीवर
( Zee Marathi New Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचनिमित्ताने स्वप्निलनं त्याची पत्नी लीना यांच्या नात्याविषयी खुलासा केला. स्वप्निलनं म्हटलं आहे, 'माझ्या लग्नाआधी असे काही प्रसंग घडले होते त्यामुळे माझे आई बाबा फार चिंतेत होते. त्यामुळे पुन्हा लग्न करावं की नाही याविषयी माझ्या मनात खूप भीती होती. नवीन मुलगी माझ्या घराला, आई वडिलांना सांभाळून घेईल की नाही अशी चिंता सतावत होती. पण लीना लग्न होऊन घरात आली आणि ती माझ्या आधी माझ्या आई वडिलांची झाली'.
हेही वाचा -
संजनाला चढला अनिरुद्धच्या प्रेमाचा लाल रंग, वटपौर्णिमेसाठी केला असा झटकीपट मेकअप!
स्वप्निलनं पुढे म्हटलंय, 'कोणताही मुलगी आपलं हक्काचं घर सोडून, आपला परिवार सोडून एका नव्या परिवारात येते आणि समर्पणाच्या भावनेनं नवीन परिवार ती आपलासा करते. तो परिवार तिची जबाबदारी बनतो तो परिवार तिचा सर्वस्व होते. तो परिवार तिचा परिवार होतो. ही कल्पनाच फार कमाल आहे. हे करणारी प्रत्येक स्त्री सावित्री आहे. माझ्या घरात लीना माझी सावित्री आहे. ते घर माझं आहे पण तिनं माझ्या परिवाराला नव्या उमेदीनं उभं केलं. त्याबद्दल मी तिचा आयुष्यभर ऋणी असेन', असं म्हणतं स्वप्निल भावूक झाला.
स्वप्निलची पत्नी लीना ही डेन्टिस्ट असून 2011मध्ये लीना आणि स्वप्निल यांनी लग्न केलं. दोघांना मायरा आणि राघव अशी दोन मुलं आहेत. लीना तिचा व्यवसाय सांभाळून घराची जबाबदारीही उत्तमरित्या सांभाळते. स्वप्निल त्याच्या कुटुंबाशी किती कनेक्टेड आहे त्याच्या सोशल मीडियावरुन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.