मुंबई, 14 जून- वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रीसाठी फारच महत्वाचा असतो. हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आज सगळीकडं महिला वर्ग नटून- थटून वडाला जाताना दिसत आहे. मालिका विश्वात देखील नायिकांनी वटपौर्णिमेसाठी खास लुक ट्राय केल्याचे दिसत आहे. पण या सगळ्यात चर्चा आहे ती फक्त आणि फक्त संजनाच्या लुकची. आई कुठे काय करते मालिकेतील ( aai kuth kay karte latest update ) संजनाचा लाल साडी लुक सध्या सगळ्यांचे लक्षवेधून घेत आहे. संजनाची भूमिका मालिकेत रूपाली भोसले (Rupali Bhosle look ) साकारताना दिसते. संजनाची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. अनिरुद्धसाठी पहिल्यांदा संजनाने वटपौर्णिमेचा उपवास केला आहे. त्याच्यासाठी ती खास तयार देखील झाली आहे. अभिनेत्री रूपाली भोसले हिनं ‘संजना’ अशी कॅप्शन देत सोशल मीडियावर तिचे काही लाल साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिने हा मेकअपही स्वत:च केला आहे. याचा व्हिडिओ देखील तिनं पोस्ट केला आहे.
अभिनेत्री रुपाली भोसलेचा वटपौर्णिमा स्पेशल लुक चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरत आहे. चाहत्यांकडून तिच्या या लुकवर कमेंटचा वर्षाव होत आहे. या लाल साडीमध्ये ती अधिक सुरेख, सुंदर दिसतेय अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
संजनाची भूमिका मालिकेत नकारात्मक आहे. भूमिका नकारात्मक असली तरी संजनाची प्रेक्षकांच्या तितकीच क्रेझ पाहायला मिळते. सोशल मीडियावर तर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतीच तिच्या एका चाहत्यांने मी फक्त संजना काय करते यासाठी मालिका पाहत असल्याची प्रतिक्रिया तिच्या एका पोस्टवर दिली होती. रुपाली भोसलेला संजनाच्या भूमिकेमुळे नवी ओळख मिळाली आहे. आज तिला अनेकजण संजना या नावाने ओळखतात. तिच्या कामाची हीच खरी पोहचपावती आहे असं म्हटलं तर वावगं वाटायला नको.