Home /News /entertainment /

आणखी एक लोकप्रिय मराठी मालिका जाणार दुसऱ्या भाषेत; कन्नड भाषेत होणार रिमेक

आणखी एक लोकप्रिय मराठी मालिका जाणार दुसऱ्या भाषेत; कन्नड भाषेत होणार रिमेक

सध्या मराठी मालिकांची लोकप्रियता वारंवार वाढत आहे. अनेक मराठी मालिकांचे विविध भाषेत रिमेक (remake)केले जात आहे. अशाच एका लोकप्रिय मराठी मालिकेचा कन्नड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  मुंबई, 4 डिसेंबर- सध्या मराठी मालिकांची लोकप्रियता वारंवार वाढत आहे. अनेक मराठी मालिकांचे विविध भाषेत रिमेक (remake)केले जात आहे. अशाच एका लोकप्रिय मराठी मालिकेचा कन्नड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवरील देवमाणूस (Devmanus). या मालिकेचा लवकरच दुसरा सीजन भेटीस येणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता देवमाणूसचा कन्नड रिमेक Doctor Karna लवकरच प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. या मालिकेतील कन्नड लोकप्रिय कन्नड अभिनेता डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या अभिनेत्याचे नाव अजून समोर आलेले नाही. लवकरच या मालिकेचा प्रोमो देखील समोर आला आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेनं चांगला टीआरपी मिळवला. अनेक प्रेक्षक न चुकता ही मालिका पाहत होते. मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण गायकवाडच्या अभिनयाचंही कौतुक झालं. लोकप्रिय ठरलेली ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
  काय होता मराठी मालिका देवमाणूसचा शेवट? 15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्यामुळे चाहते फारच उत्सुक होते. पण शेवटी प्रेक्षकांची निराशाच झालेली पाहायला मिळाली. आता तरी देवी सिंग पोलिसांच्या ताब्यात जाईल असं प्रेक्षकांना वाटत होतं पण तसं झालं नाही.दरम्यान शेवटी चंदाचा आणि विजयचा मृत्यू दाखवला आहे. याशिवाय नव्यानेच मालिकेत एन्ट्री दाखवलेल्या स्त्रीचा देखील डॉक्टर ने खून केलेला दाखवला आहे. वाड्यातील लोकांना देवमाणसाचा खरा चेहरा मात्र समजला नाही.चंदा आणि डॉक्टरचा मृत्यू झाल्याचं लोकांना समजत. तर डॉक्टरच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकूणच संपूर्णपणे अनपेक्षित शेवट पाहायला मिळाला आहे. वाचा : 'प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं... लढ'; प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत दरम्यान डॉक्टरचा मृत्यू झाला नसून तो जिवंत आहे. डिम्पलने चंदाचा खून केला. तर तिची बॉडी देखील जाळून टाकली. याशिवाय आणखी एक बॉडी तिथे जळत असते. तिच्या आजूबाजूला डॉक्टर च साहित्य पसरवलेल असतं. त्यामुळे डॉक्टरचाच मृत्यू झाल्याचं डिम्पलने भासावल होतं. तर आता ती देखील घरातून पळून गेली आहे.डॉक्टर एका दवाखान्यात अॅडमिट आहे. व तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ‘देवमाणूस 2’ची (Devmanus season 2) उत्सुकता वाढली आहे. तर मालिकेचा अद्याप शेवट झाला नसल्याने आणखी एक भाग येणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी शेवट योग्य केला नाही यामुळे नाराजी व्यक्त केली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial

  पुढील बातम्या