Home /News /entertainment /

Aditi Sarangdhar: लेकाचा मोबाईवरचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी अभिनेत्रीनं लढवली भन्नाट शक्कल

Aditi Sarangdhar: लेकाचा मोबाईवरचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी अभिनेत्रीनं लढवली भन्नाट शक्कल

(Wadalvaat marathi serial) वादळवाट मालिकेत झळकलेली ही अभिनेत्री तिच्या मुलासोबत मस्त वेळ घालवताना दिसत आहे.

  मुंबई 5 जुलै: वादळवाट (Vadalvaat) या (Zee Marathi) झी मराठीवरील मालिकेला आज इतके वर्षांनी सुद्धा कोणीच विसरू शकलं नाहीये. या मालिकेतील पात्रांना आजही खूप लोक मालिकेतल्या नावानेच ओळखतात. या मालिकेत रमा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) सध्या तिच्या मुलासोबत वेळ घालवायला एक भन्नाट शक्कल लढवताना दिसत आहे. मुलांचा सतत वाढणारा स्क्रीन टाइम ही पालकांची एक मोठी समस्या आहे असं अनेकदा समोर आलं आहे. रोजच्यारोज मुलांचं स्क्रीनकडे असलेलं आकर्षण थोडं कमी करावं म्हणून या अभिनेत्रीने एक मस्त कल्पना अमलात आणली आहे. तिने एका मुलाखतीत याबद्दल आपलं मत मांडलं होतं. राजश्री मराठीशी बोलताना अदिती असं सांगते, “माझ्या मुलाचा स्क्रीन टाइम कमी व्हावा म्हणून मी एक ऍक्टिव्हिटी शोधून काढली आहे. अनेकदा त्यांना काहीतरी करायला दिलं आणि आपण बाहेर पडलो तर त्यांना आपोआप कंटाळा येतो. मुलांना सुट्ट्या लागल्यावर सतत वाढणारा टीव्हीचा वेळ कमी करायला काहीतरी करायला हवं म्हणून मी प्लेन काहीच डिजाईन नसलेले टीशर्ट मागवते, काही ऍक्रेलिक रंग मागवतो आणि माझ्या मुलाला त्यावर हवं ते चित्र, कलाकुसर करायला देते. आणि हे कपडे मी रोजच्या वापरात बाहेर जाताना सुद्धा घालते. म्हणजे त्याने केलेल्या गोष्टीचा त्याला कमीपणा वाटू नये, ते खराब आहे असं वाटू नये म्हणून त्याची ही कलाकुसर मी सगळीकडे मिरवते. मी ही आता न्यू एज पॅरेंटिंगचा फंडा स्वीकारायचा प्रयत्न करत आहे.” हे ही वाचा- Marathi actors in moustache: 'मुछे हो तो एैसी', अभिनेत्यांचे मिशीमधले किलर लुक पाहाच! अदिती या मुलाखतीच्या निमित्ताने तिच्या लहानपणीच्या आठवणी सुद्धा सांगते. लहान असताना पावसाळ्यात केलेली मजा, किस्से सुद्धा ती शेअर करते. सध्या अदितीने अजमवलेला हा नवीन पॅरेंटिंगचा फंडा पालकांकडून पसंत केला जात आहे.
  अदितीला अरिन नावाचा मुलगा आहे आणि त्याच्यासोबत ती अनेक धमाल विडिओ कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते.अदिती मागच्या काळात ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत एका खल भूमिकेत दिसली होती. तसंच ‘हम बने तुम बने’ मालिकेत ती एका मस्त भूमिकेत दिसून आली होती. सध्या ही अभिनेत्री सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Zee marathi serial

  पुढील बातम्या