Home /News /entertainment /

अखेर नेहाच्या पहिल्या नवऱ्याची मालिकेत एंट्री, 'हा' अभिनेता साकारणार अविनाशची भूमिका

अखेर नेहाच्या पहिल्या नवऱ्याची मालिकेत एंट्री, 'हा' अभिनेता साकारणार अविनाशची भूमिका

अखेर नेहाच्या पहिल्या नवऱ्याची मालिकेत एंट्री, 'हा' अभिनेता साकारणार अविनाशची भूमिका

अखेर नेहाच्या पहिल्या नवऱ्याची मालिकेत एंट्री, 'हा' अभिनेता साकारणार अविनाशची भूमिका

नेहाच्या लग्नात तिच्या पहिल्या नवऱ्याची झलक दाखवण्यात आली होती. मात्र आता नेहाच्या पहिल्या नवऱ्याचा चेहरा अखेर समोर आला आहे. त्याच्या येण्यानं नेहा यशच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे.

  मुंबई, 17 जून: माझी तुझी रेशीमगाठ ( Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत यश नेहा ( Yash-Neha) यांच्यातील रेशीमगाठ जुळत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना दोघांच्या प्रेमाला आता ग्रहण लागणार आहे. मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून ज्यात अविनाशची ( Avinash) एंट्री दाखवण्यात आली आहे. खरंतर नेहाच्या लग्नातच अविनाश तिच्या घरी गेल्याच पाहायला मिळालं होते. मात्र त्याचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. अखेर नेहाच्या पहिल्या नवऱ्याचा अविनाशचा चेहरा सर्वांसमोर आला आहे. नेहा आणि परी यशबरोबर पॅलेसमध्ये राहायला आलेत. दोघींचं आयुष्य सुरक्षित झालेलं असताना नेहा आणि परीच्या आयुष्यात अविनाश नावाचं वादळ येणार आहे. नेहाचा पहिला नवरा अविनाश दोघींच्या आयुष्यात नवं वादळ घेऊन येणार आहे. अविनाशच्या येण्यानं नेहा आणि यश यांच्या प्रेमाला तडा जाणार आहे.
  मालिकेत अविनाशच्या एंट्रीचा मोठा ट्विस्ट पाहायला फार मज्जा येणार आहे कारण, अविनाश थेट यशच्या पॅलेसमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला लागणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, अविनाश पॅलेसमध्ये ड्रायव्हर म्हणून जातो. साहेबांच्या लहान मुलीसाठी ड्रायव्हर म्हणून मला बोलावलं आहे असं सांगतो.  'अखेर तुझ्या पॅलेसमध्ये मी आलोय नेहा, आता तु  माझी बायको नसली तरी परी माझी मुलगी आहे', असं म्हणत अविनाश पॅलेसमध्ये एंट्री करतो. हेही वाचा - आईचा कितीही उत्तम outfit बाळासाठी टॅावेलच! अभिनेत्रीचा क्यूट VIDEO चर्चेत अविनाशच्या येण्यानं मालिकेला नवं वळणं येणार आहे. अविनाश परीचा ड्रायव्हर म्हणून काम करणार आहे. नेहा आणि अविनाश एकमेकांसमोर आल्यानंतर नेमकं काय होणार? परीला तिच्या खऱ्या वडिलांची ओळख पटणार का? तसंच चौधरींच्या घरात यानं काय नाट्य सुरू होणार? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. त्याचप्रमाणे आता अविनाशच्या मदतीनं मीनाक्षी वहिनी नवी खेळी खेळणार का? असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझी तुझी रेशीमगाठच्या येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिनेता डॉ. निखिल राजेशिर्के ( Actor Dr. Nikhil Rajeshirke) नेहाच्या पहिल्या नवऱ्याच्या म्हणजेच अविनाशच्या भूमिकेत दिसणार आहे. निखिल हा झी मराठीवरील प्रेक्षकांसाठी ओळखीचा चेहरा आहे. निखिलनं आधी झी मराठीवर, 'आभाळमाया', 'अरुंधती' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे 'अजूनही बरसात आहे', 'एक मोहोर अबोल', 'दिल्या घरी तू सुखी रहा', 'लगोरी', 'प्रीती परी तुजवरी', 'लक्ष' सारख्या मालिकेतही काम केलं आहे. तसंच निखिलनं 'बायकर्स अड्डा', 'असेही एकदा व्हावे', '7 दोन 75', 'फक्त इच्छाशक्ती हवी'  या सिनेमांमध्येही काम केलंय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या