जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आईचा कितीही उत्तम outfit बाळासाठी टॅावेलच! अभिनेत्रीचा क्यूट VIDEO चर्चेत

आईचा कितीही उत्तम outfit बाळासाठी टॅावेलच! अभिनेत्रीचा क्यूट VIDEO चर्चेत

आईचा कितीही उत्तम outfit बाळासाठी टॅावेलच, अभिनेत्रीचा क्यूट VIDEO चर्चेत

आईचा कितीही उत्तम outfit बाळासाठी टॅावेलच, अभिनेत्रीचा क्यूट VIDEO चर्चेत

बाळाला टापटिप, नेटनेटक ठेवताना आईची कशी तारांबळ उडते. तिच्या कपड्यांचीही कशी वाट लागते हे सांगणारा एक व्हिडीओ अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हीनं शेअर केलाय. या व्हिडीओ चांगली पसंती मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून: अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ( Urmila Nimbalkar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आई झाल्यापासून तर ती बाळाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. उर्मिलाचे यूट्यूब व्हिडीओ तर व्हायरल होत असतात पण तिचे तिच्या बाळाबरोबरचे व्हिडीओही कायम चर्चेत असतात. उर्मिलानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती छोट्या अथांगला ( Athang) जेवण भरवताना दिसत आहे. एका आईला आपल्या बाळाला भरवताना किती गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं, हे सगळं पाहायला मिळत आहे.  बाळाला टापटिप, नेटनेटक ठेवताना आईची कशी तारांबळ उडते. तिच्या कपड्यांचीही कशी वाट लागते हे देखील उर्मिलानं व्हिडीओत सांगितलं आहे. उर्मिलानं अथांगबरोबर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती मस्तपैंकी अथांगला जेवण भरवताना दिसतेय. आणि ती म्हणतेय ‘माझ्या सगळ्या टी-शर्टच्या डाव्या हाताला वरणभाताचे डाग लागले आहेत. तर अथांगही उर्मिलाला प्रतिसाद देत हसताना दिसत आहे. उर्मिलानं व्हिडीओला कॅप्शन देत म्हटलंय, ‘आईचा कितीही उत्तम outfit, बाळासाठी टॅावेलच असतो. माझ्या प्रत्त्येक ड्रेसच्या डाव्या खांद्यावर केळाचं शिकरण, नाचणी, वरणभात असे पिवळे, विटकरी डाग आहेत, मी त्याला  a dress by Haute Couture designer Athaang असं म्हणते!’

जाहिरात

हेही वाचा - PHOTO: अभिनेते मिलिंद गवळींच्या वाढदिवसाचं सेटवर जंगी सेलिब्रेशन, थेट आरती गात दिल्या शुभेच्छा उर्मिलानं शेअर केलेला क्यूट व्हिडीओ सध्या सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. आणि त्याहून जास्त उर्मिलानं दिलेलं कॅप्शनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  एका आईचं आयुष्य बाळ झाल्यानंतर कसं बदलतं, तिला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे नेहमीच उर्मिला तिच्या चाहत्यांना सांगत असते. आजही उर्मिलानं सांगितलेली ही गोष्ट अनेक स्त्रियांनी, आयांनी रिलेट केली आहे. उर्मिलाच्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्स मध्ये अनेक आईंनी म्हटलंय, ‘खरंय माझं बाळ पण असंच करतं’, तर अनेक युझर्सनी उर्मिला आणि अथांगवर प्रेमाचा वर्षाव केलाय. एका युझरनं म्हटलंय, ‘किती गोड बाळ आणि आई तर खूपच गोड’. तर दुसऱ्या युझरनी म्हटलंय, ‘उर्मिला आईपण खऱ्या अर्थानं एंजॉय करतेयस’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात