जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अबोली मालिकेत येणार नवं वळण; रेशम टिपणीस साकारणार महत्त्वाची भूमिका

अबोली मालिकेत येणार नवं वळण; रेशम टिपणीस साकारणार महत्त्वाची भूमिका

अबोली मालिकेत येणार नवं वळण; रेशम टिपणीस साकारणार महत्त्वाची भूमिका

स्टार प्रवाह वाहिनीवर अबोली मालिका काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता या मालिकेत अभिनेत्री रेशम टिपणीस हिची एंट्री होणार आहे. तिच्या येण्यामुळे मालिकेत नवा ट्वविस्ट पाहायला मिळणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी- स्टार प्रवाह वाहिनीवर अबोली ( Aboli latest episode)  मालिका काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे ही मालिका कमी वेळेतच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. या मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसत आहे. सोबतच सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी तगडी कलाकारांची फौज या मालिकेत पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत आणखी एक मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीची**( Resham Tipnis )**एंट्री होणार आहे. या अभिनेत्रीने मराठी व हिंदी मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमठवला आहे. अभिनेत्री रेशम टिपणीस अबोली मालिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत विश्वासच्या वकिलाची भूमिका साकारणार आहे. एका पोर्टलने यासंबंधी त्यांच्या इन्स्टा पेजवर याविषयी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे रेशमने देखील तिच्या इन्स्टावर माहिती दिली आहे. तिन तिचा काळा रंगाच्या ब्लेजरमधील एक फोटो शेअर केला आहे. तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काहीतरी नवीन येत आहे . याबद्दल मी तुम्हाला अपडेट देत राहील. वर्क मोड 2022… गणपती बाप्पा मोरया. चाहत्यांनी देखील तिला कमेंट करत याविषयी विचारले आहे. काहींनी कमेंट करत अबोली मालिकेचा उल्लेख देखील केला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच तिला अबोली मालिकेत उत्सुकता लागली आहे. रेशमाच्या येण्यामुळे मालिकेत कोणता नवीन ट्वी्ट येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जाहिरात

छोटा पडदा गाजवणारी रेशम बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) पहिल्या पर्वामुळे विशेष चर्चेत आली.रेशमने बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व केवळ गाजवलंच नाही तर यात तिच्या आणि राजेश शृंगारपुरेच्या नावाचीही जोरदार चर्चा झाली. यासोबतच रेशम सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते. रेशम तिच्या मुलांसोबतचे काही फोटो पोस्ट करत असते. वाचा- बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीला मिळाला नवा प्रोजेक्ट अबोली मालिका ही अबोलीच्या संघर्षाची आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. अबोली ही अतिशय साधी मुलगी आहे. नावाप्रमाणेच अबोल, कमी बोलणारी. तिचं असं वेगळं जग आहे ज्यात ती रमते. खरंतर तिला तिचं म्हणणं मांडायचं असतं मात्र तिला ते मांडू दिलं जात नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात