मुंबई, 28 एप्रिल : झी मराठीवर सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या झी मराठीच्या मालिकांचा टीआरपी काही कमी झाला आहे. त्यामुळे वाहिनी सध्या टीआरपी वाढण्यासाठी नवनवीन फंडे वापरत आहेत. नुकतंच काही नवीन मालिका सुरु झाल्या होत्या. आता या वाहिनीवर पुन्हा एकदा नवीन मालिका सुरु होत आहे. झी मराठीवर सा रे ग म प, डान्स महाराष्ट्र डान्स, फु बाई फु यासारखे अनेक रिऍलिटी गाजले आहेत. असाच एक रिऍलिटी शो झी मराठीवर गाजला होता. आता तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परतणार आहे. झी मराठीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी एक गाजलेला शो पुन्हा परतणार आहे. अवधूत गुप्ते निर्देशित ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम लवकरच पुन्हा नव्याने सुरु होणार आहे. झी मराठीने ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अवधूत गुप्तेच या शो मध्ये नव्या रूपात परतणार असल्याचं समजतं आहे. व्हिडिओमध्ये अवधूत त्याच्या स्टाईलमध्ये म्हणत आहे की, ‘प्रश्नांची धार वाढणार…आता खुपणार नाही तर टोचणार…‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच.’ अवधूत गुप्तेने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत ‘खुपते तिथे गुप्ते लवकरच…पुन्हा घेऊन येतोय तुमच्या भेटीला.’ असं त्याने म्हटलं आहे. अवधूतच्या या नव्या घोषणेमुळे चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
खुपते तिथे गुप्ते’ प्रेक्षकांचा आवडता, जबरदस्त आणि अफलातून कार्यक्रम 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्यातील गुपितं उलगडली जातात. हा कार्यक्रम एकेकाळी चांगलाच गाजला होता. मोठमोठ्या अभिनेते, गायक, दिग्दर्शकांसोबतच राजकारण्यांनी देखील या शोला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील व्हिडीओज आजही व्हायरल होतात. आता हीच जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. Salman Khan: तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा एकत्र येणार सलमान खान अन् करण जोहर; खूपच खास आहे कारण ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सीझनमध्ये देखील कलाकार मंडळी आणि राजकारणी तसेच नोकरदार यांच्यामध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने चॅनलच्या टीआरपीमध्ये वाढ होणार कि नाही ते पाहणं महत्वाचं आहे.

)







