Home /News /entertainment /

Devmanus2: देवमाणसाची झोप उडवणार इन्स्पेक्टर जामकरचा रुद्र अवतार! बज्यावर झाडणार धडाधड गोळ्या

Devmanus2: देवमाणसाची झोप उडवणार इन्स्पेक्टर जामकरचा रुद्र अवतार! बज्यावर झाडणार धडाधड गोळ्या

Devmanus2: देवमाणसाची झोप उडवणार इन्स्पेक्टर जामकरचा रुद्र अवतार! बज्यावर झाडणार धडाधड गोळ्या

Devmanus2: देवमाणसाची झोप उडवणार इन्स्पेक्टर जामकरचा रुद्र अवतार! बज्यावर झाडणार धडाधड गोळ्या

अजितकुमारला अटक केल्यामुळे गावकरी चांगलेच संतापले आहेत. अजितकुमारची बाजू घेत संपूर्ण गाव इन्स्पेक्टर जामकरच्या विरोधात उभं राहिलं आहे. मात्र या सगळ्यात बज्याचा जीव जाणार आहे. काय घडणार मालिकेच्या येत्या भागात जाणून घ्या. (Devmanus 2 Letest Episode)

पुढे वाचा ...
  मुंबई, 05 जून: झी मराठीवरील (Zee Marathi) 'देवमाणूस 2' (Devmanus2) ही मालिका दिवसेंदिवस चांगलीच रंगतदार होत चालली आहे. इन्स्पेक्ट मार्तंड जामकरनं (  Inspector Martand Jamkar) देवमाणसाला धडा शिकवण्याचा उचलेला विडा तो पूर्ण करताना दिसत आहे. चिंगीच्या मृत्यूनंतर मार्तंड जामकर यांनी डॉक्टर अजित कुमारला (Ajitkumar Dev) ताब्यात घेतलं आहे. अजितकुमारला अटक केल्यामुळे गावकरी चांगलेच संतापले आहेत. अजितकुमारची बाजू घेत संपूर्ण गाव इन्स्पेक्टर जामकरच्या विरोधात उभं राहिलं आहे. गेली अनेक दिवस आपल्या करारी जबाबानं सर्वांना उत्तर देणारा मार्तंड जामकर आता त्याचा रुद्र अवतार सर्वांसमोर आणणार आहे. त्यामुळे अजित कुमारची चांगलीच झोप उडणार आहे. पण या सगळ्यात बज्याचा जीव जाणार आहे. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून ज्यात इन्स्पेक्टर जामकर बज्याला सर्वांसमोर धडाधड गोळ्या झाडमार आहे. प्रदर्शित झालेल्या प्रेमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, अजितकुमार आणि नामदेव यांना अटक केल्यानं त्यांच्या सुटकेसाठी गावकरी इन्स्पेक्टर जामकर विरोधात पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करतात. 'इन्स्पेक्टर जामकर मुडदाबाद', अशा घोषणा करताना बज्या स्वत: च्या अंगावर रॉकेल ओतून घेतो. सगळा प्रकार पाहून जामकर संतापतात आणि बज्यावर गोळ्या झाडीन अस म्हणतात. जामकरला प्रत्युत्तर करत बज्या 'झाडा गोळ्या', असं म्हणतो आणि इन्स्पेक्टर जामकर यांचा रुद्र अवतार बाहेर येऊन तो बज्यावर धडाधड गोळ्या झाडतो.
  इन्स्पेक्टर जामकरच्या हा रुद्र अवताराने अजितकुमारसह, नामदेव आणि संपूर्ण गावकरी हैराण झाले आहेत. हेही वाचा - Chala Hawa Yeu Dya: कुशलची पुन्हा झाली हवा येऊ द्या च्या सेट वर फजिती; आज या गोष्टीमुळे पडला तोंडावर बज्याला गोळ्या लागल्यानं गावकऱ्यांनी भितीनं तिथून पळ काढतात. इन्स्पेक्टर जामकर यांचा हा रौद्र अवतार देवमाणसाची सगळी पाप बाहेर आणणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. जामकरचा रौद्र अवतार पाहून अजितकुमारच्या तोंडचं पाणी पळालं आहे. इन्स्पेक्टर जामकरसमोर कोणाचाच जोर चालणार नाही हे देखील आता सर्वांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे देवमाणसाच्या गुन्ह्यांची शिक्षा त्याला होणार का? तसंच बज्यावर गोळ्या घातल्यानं इन्स्पेक्टर जामकर अडचणीत येणार का? यासाठी मालिकेचे आगामी एपिसोड पाहणं म्हत्त्वाचं ठरेल.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या