मुंबई 4 जून: अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) इन्स्टाग्रामवर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. कुशल ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक आहे. त्या मालिकेचं वेड इतकं आहे की आजही त्याचा भाग न होता कोणत्याही चित्रपट नाटकाचं प्रमोशन होऊच शकत नाही. कुशल आणि बाकीची सगळीच टीम हवा येऊ द्या च्या सेट वर चालणारी मजा मस्ती सुद्धा चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण आज कुशलला या सेटवर पुन्हा एकदा तोंडावर पडायची वेळ आली आहे. कुशलने मागे एकदा एक भन्नाट किस्सा शेअर केला होता. आपल्यासोबत काम करणारे को-स्टार जेव्हा भूमिकेच्या बाहेर येऊन एखादा स्क्रिप्ट बाहेरचा विनोद घेतात तेव्हा कशी फाफलते यावर त्याने झालेली फाजती सगळ्यांसोबत शेअर केली होती. आता अशीच काहीशी वेळ पुन्हा आली आहे. कुशलने एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत “आमच्या तुषार देवलच music च timing एवढ खतरनाक आहे की प्रत्येक वेळी आमची गोची होते. आम्हाला तोंडावर पाडणे हा त्याचा तालसिद्ध अधिकार आहे.” असं म्हटलं आहे. नक्की काय घडलं सेट वर? कुशलने शेअर केलेल्या विडिओमध्ये श्रेया बुगडे प्रसिद्ध चित्रपट ‘जैत रे जैत’ मधील मी रात टाकली गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. त्या गाण्यातील कोरसचा भाग सुरु होताना कुशल आणि अंकुर यांनी एक बम्पर लाफ्टर देणारा डान्स करायचा असं ठरलं असतानाही संगीत संयोजन संभाळणाऱ्या तुषार देवलकडून गाणं थांबत आणि कुशल आणि अंकुर तरीही ती स्टेप घेऊन नाचतात. दोघेही आपल्या पात्रांना न जणारा डान्स करत असल्याने एवढा बम्पर लाफ्टर येतो की वन्स मोअरची मागणी होते. मात्र ठरलेली जागा तुषार विसरल्याने कुशलला आयत्यावेळी तोंडावर पडायची वेळ आली असा भन्नाट किस्सा त्याने शेअर केला आहे.
; मागच्या वेळी श्रेया बुगडे भूमिकेच्या बाहेर येऊन एक वेगळंच वाक्य घेते आणि त्या अनपेक्षित गोष्टीने पडलेला फम्बल कुशलला चांगलाच महागात पडतो असा किस्सा त्याने शेअर केला होता. **हे ही वाचा- ‘** आणि ‘तो’ सीन असलेला भाग काल प्रदर्शित झाला…’ आधी ट्रोल आणि आता प्राजक्ता माळीचं कौतुक चला हवा येऊ द्या च्या सेटवर दर आठवड्याला कुठल्यातरी सुपरहिट चित्रपटाचं विडंबन होत असतं. तालीम आणि संहिता याव्यतिरिक्त सुद्धा अनेक विनोद व द स्पॉट इथे घेतले जातात. या कलाकारांमध्ये असलेला खेळकरपणा, खोडकरपणा कधीकधी अशा किस्स्यांच्या माध्यमातून बाहेर येतो.