VIDEO- ...म्हणून कार सोडून चालत जिममध्ये पोहोचली जान्हवी कपूर

VIDEO- ...म्हणून कार सोडून चालत जिममध्ये पोहोचली जान्हवी कपूर

तिने टाइट कपड्यांसोबत स्लिपर घातले होते. अचानक जान्हवीला जिमच्या कपड्यांत रस्त्यावर चालताना पाहून आजूबाजूच्यांचा नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या.

  • Share this:

मुंबई, १३ जून- जान्हवी कपूर तिच्या फिटनेसबाबतीत नेहमीच सजग असते. तिचे जिमला जातानाचे आणि जिमवरून येतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज शेअर होत असतात. या सगळ्यात जिममध्ये जातानाचं तिचं स्वतःचं असं स्टाइल स्टेटमेन्टही आहे. मीडियाला पाहून नेहमीच ती पोजही देते. यावेळी जान्हवी कपूर जिमला चक्क पायी जाताना दिसली. सध्या तिचा पायी जिममध्ये जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्याचे झाले असे की, जान्हवी जिमला नेहमी गाडीतून जाताना दिसते. पण यावेळी ती सुरक्षा रक्षकासोबत पायी जिमच्या इमारतीत जाताना दिसली. यावेळी तिने काळ्या रंगाचे जिमचे कपडे घातले होते. तिने या टाइट कपड्यांसोबत स्लिपर घातले होते. अचानक जान्हवीला जिमच्या कपड्यांत रस्त्यावर चालताना पाहून आजूबाजूच्यांचा नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या. या जिम आउटफिटसोबत जान्हवीकडे पिवळ्या रंगाची बॅगही होती. मीडिया रिपोर्टनुसार, जिमला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे जान्हवीने सुरक्षा रक्षकासोबत अखेर पायी जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- अर्जुन कपूरपासून सलमान खानपर्यंत, या 5 स्टार्सची बॉडी आहे जबरदस्त

हेही वाचा- शिव- रुपालीवरून घरात वाद, नक्की कोणाला नापास करणार नेहाची टीम

काही दिवसांपूर्वी कतरिना कैफने जान्हवीच्या शॉर्ट पॅन्टवर कमेंट करत म्हटलं होतं की, ‘तिचे तोकडे कपडे पाहिल्यावर मला काळजी वाटते.’ जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे गुंजन सक्सेना बायोपिक आहे. याशिवाय करण जोहरच्या तख्त सिनेमातही ती दिसणार आहे.

VIDEO :जेव्हा सलमान खानने गायलं, 'गच्ची वरून कशी दिसते..'

First published: June 13, 2019, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading