झायरा वसीमच्या निर्णयावर अब्बू आझमी आणि शिवसेनेत जुंपली! Zaira Wasim | Shivsena | BJP | Abu Azmi |

झायरा वसीमच्या निर्णयावर अब्बू आझमी आणि शिवसेनेत जुंपली! Zaira Wasim | Shivsena | BJP | Abu Azmi |

Zaira Wasim | Shivsena | BJP | Abu Azmi | हा निर्णय इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांसाठी योग्य आहे. इस्लाम धर्मात नाच-गाणं चालत नाही.

  • Share this:

मुंबई, 01 जुलै-  बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. बॉलिवूडमध्ये आल्यापासून तिच्यात आणि अल्लाहच्या मार्गात फार अंतर आल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं. आता तिला धर्म आणि शांतीसाठी बॉलिवूडला अलविदा म्हणायचे आहे. झायराच्या या अचानक एक्झिटनंतर आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आझमी यांनी झायराच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इस्लाम धर्मात नाच गाचणं आणि गाणं चालत नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांसाठी योग्य आहे असं म्हणत अबू आझमी यांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. इस्लाम धर्मात नाच-गाणं चालत नाही असं ते म्हणाले.

आई मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्यावर मुलगा अरहानने दिली अशी रिअॅक्शन

अबू आझमीप्रमाणे अन्य राजकीय नेत्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, शिवसेने झायराच्या या निर्णयाची निंदा केली. शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर आपली प्रतिक्रिया शेअर केली. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘तुला जर तुझा धर्म आकर्षित करत आहे तर तू नक्कीच आस्थेने त्याचं पालन करू शकते. पण कृपया आपल्या करिअरचा निर्णय धर्माच्या आधारावर घेऊ  नको. हा निर्णय तुझ्या धर्माला असहिष्णु बनवत आहे. हा तिच्या धर्मासाठीही मोठं पाऊल आहे. इस्लाममध्ये सहिष्णुतेला काही जागा नाही ही चुकीची प्रथा पाडू नकोस.’

झायरा वसीमची बॉलिवूड एक्झिट, मॅनेजरने केला खळबळजनक खुलासा!

भाजपचे प्रश्न तर उमर अब्दुल्लांचं समर्थन- भाजपने झायराच्या सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय हा दबावात येऊन घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. भाजपचे प्रवक्ता शाहनवाज हुसैन यांनी मुलाखतीत म्हटलं की, ‘धर्माच्या आधारावर अभिनय सोडण्याचा निर्णय दबावात घेण्यात आला असे वाटते. ती नेहमीच कट्टरपंथी समुदायांच्या निशाण्यावर होती. तर उमर अब्दुल्ला यांनी झायराच्या निर्णयाचा सन्मान करण्यास सर्वांना सांगितले.

याशिवाय मुळचा काश्मिरी असणारा अभिनेता इक्बाल खानने तिच्या निर्णयावर ट्वीट करत म्हटलं की, ‘झायरा वसीमला थांबायचं आहे यात कोणती मोठी गोष्ट आहे. तिची मर्जी. असं असू शकतं की ती जे करत आहे ते चुकीचं असेल आणि म्हणून तिला सोडायचं असेल. मीही एक अभिनेता आहे. मी काही चुकीचं करत नाहीये आणि मला इस्लामचं पालन करण्यातही कोणती अडचण येत नाहीये.’

जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम, पाहा गडाचा अवर्णनीय Exclusive VIDEO

First published: July 1, 2019, 1:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading