जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Yuvraj Singh- निवृत्तीनंतर युवराज- हेजलचा हा व्हिडिओ होतोय VIRAL

Yuvraj Singh- निवृत्तीनंतर युवराज- हेजलचा हा व्हिडिओ होतोय VIRAL

हेजल म्हणाली की, मी अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. कारण मला श्वास घ्यायला त्रास होत होता. चिंतेचं काही कारण नव्हतं. पण कळल्यावर ऑपरेशन करणं गरजेचं होतं.

हेजल म्हणाली की, मी अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. कारण मला श्वास घ्यायला त्रास होत होता. चिंतेचं काही कारण नव्हतं. पण कळल्यावर ऑपरेशन करणं गरजेचं होतं.

वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन करणारा सिंग इज किंग युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 10 जून- युवराज सिंग या नावाला कोणतीही वेगळी ओळख देण्याची गरज नाही. त्याचं क्रिकेटमधलं योगदान आणि भारतीय क्रिकेटसाठीचं त्याचं नित्सिम प्रेमच सगळं काही बोलू जातं. 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन करणारा सिंग इज किंग युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. युवराजनं आज दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत आपली निवृत्ती जाहीर केली. ‘या’ मराठमोळ्या कलाकाराची पत्नी आजही करते घरकाम भारतातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूपैकी एक असलेल्या युवराज सिंग हा आजही सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. 2007 च्या टी-20 क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंडविरोधात स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्यानंतर 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये रक्ताच्य उलट्या होत असूनही युवराजनं माघार घेतली नाही. या वर्ल्ड कपचा तो, मालिकावीर ठरला होता. यानंतर युवराज सिंगला रक्ताचा कर्करोग झाल्यामुळं तो काही काळ क्रिकेटपासून लांब होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. सर्जरीनंतर अशक्त झाल्या तनुजा, काजोलने शेअर केली भावुक पोस्ट! युवराजच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर त्याचे अनेक सामन्यांचे व्हिडिओ शेअर होत आहेत. युवराजच्या गाजलेले सामने, त्याचे रेकॉर्ड्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहेत. दरम्यान, त्याची पत्नी हेजल किचसोबतचा लग्नापूर्वीचा एक मजेशीर व्हिडिओही व्हायरल होत आहे. युवराज आणि हेजल दोघंही लग्नापूर्वी कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गेले होते. हा कपिलचा व्हिडिओ आजही अनेकजण आवर्जुन पाहत आहेत. सुमारे दोन कोटी लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला. युवराज आणि हेजलचा हा व्हिडिओ इथे पाहा

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात