‘या’ मराठमोळ्या कलाकाराची पत्नी आजही करते घरकाम, घराचं भाडं देण्याएवढेही नाहीत पैसे

‘या’ मराठमोळ्या कलाकाराची पत्नी आजही करते घरकाम, घराचं भाडं देण्याएवढेही नाहीत पैसे

याशिवाय आमच्याकडे कोणता पर्याय नाहीये. ती महिन्याला ७ हजार रुपये कमावते आणि घर चालवायला मदत करते. ती फार मेहनत घेते.

  • Share this:

मुंबई, 10 जून- सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जर त्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर त्यानंतर सिनेमाचे मुख्य कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचा सुगीचा काळ सुरू होतो असं म्हटलं जातं. पण, प्रत्येकवेळी तसं होतंच असं नाही. ५९ वर्षीय वीरा साथीदार यांच्यासोबत मात्र असं काही झालं नाही. कोर्ट सिनेमात वीरा यांनी काम केलं आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. वीरा यांनी दिल्ली टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ‘कोर्ट प्रदर्शित होऊन चार वर्ष झाली. या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांसह अन्य अनेक पुरस्कार जिंकले. पण या सर्वाने माझ्या आयुष्यात कोणताच बदल झाला नाही.’

सर्जरीनंतर अशक्त झाल्या तनुजा, काजोलने शेअर केली भावुक पोस्ट!

याचं वीरा यांना दुःखही नाही. उलट त्यांनी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांची स्थिती माझ्याहून वाईट आहे. मी लिखाण आणि लेक्चर घेऊन पैसे कमावतो. यातून काही दिवस निर्वाह होऊन जातो.

वीरा हे नागपुर बाबुलखेडा येथे भाड्याच्या घरात राहतात. आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘मला या गोष्टीचं खूप दुःख आहे की माझी पत्नी दररोज घरी येऊ शकत नाही. कारण घरी येण्या- जाण्याचं भाडं परवडत नाही. मी माझ्या घराचं भाडंही अनेकदा देऊ शकत नाही. माझे मित्र मला अनेकदा आर्थिक मदत करतात.’

हृतिक रोशनच्या बहिणीची तब्येत बिघडली, या मानसिक आजाराने ग्रासलं

वीरा यांची पत्नी पुष्पा या परसोडी गावात आंगडवाडीमध्ये काम करतात. ही आंगणवाडी नागपुरपासून ३० किलोमीटर दूर आहे. ती काम संपल्यानंतर तिथेच कुठे तरी राहते. साथीदार पुढे म्हणाले की, ‘याशिवाय आमच्याकडे कोणता पर्याय नाहीये. ती महिन्याला ७ हजार रुपये कमावते आणि घर चालवायला मदत करते. ती फार मेहनत घेते. दिवसभराच्या कामांनंतर ती तिथेच लोकांच्या घरी काम करते. या मोबदल्यात ते तिला जेवण आणि राहायला देतात.’ वीरा साथीदार दर आठवड्याला पत्नी घरी येण्याची वाट पाहतात. पत्नीला चहा आणि जेवण करून देण्याची त्यांची इच्छा असते.

...म्हणून मार्वलच्या थोरने आपल्या मुलीचं नाव ठेवलं ‘इंडिया’

वीरा पुढे म्हणाले की, ‘पत्नीला आराम मिळेल याचा मी प्रयत्न करतो. तिने आमच्यासाठी खूप सोसलं आहे. माझ्या आगामी सिनेमांच्या प्रदर्शनानंतर मला चांगल्या ऑफर मिळतील आणि माझ्या पत्नीचा संघर्ष थोडा कमी होईल. ती घरी येऊन आराम करू शकेल.’

VIDEO : पुण्यात मुसळधार; अनेक रस्त्यांवर साचलं पाणी

First published: June 10, 2019, 1:00 PM IST

ताज्या बातम्या