सर्जरीनंतर अशक्त झाल्या तनुजा, काजोलने शेअर केली भावुक पोस्ट!

सर्जरीनंतर अशक्त झाल्या तनुजा, काजोलने शेअर केली भावुक पोस्ट!

नुकताच काजोलने आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तनुजा फार अशक्त दिसत आहेत. पटकन त्या तनुजा आहेत हे कळूनही येत नाही.

  • Share this:

मुंबई, 10 जून- बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. या दुःखातून काजोल स्वतःला सावरते न सावरतेच तोच दोन दिवसांनी काजोलची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची तब्येत खालावली. त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांची सर्जरी करण्यात आली. आता त्यांची तब्येत उत्तम आहे.

तनुजा यांना डायवर्टीक्यूलिटिस अर्थात पचन क्रियेशी निगडीत आजार आहे. यात पोटाला सूज येते आणि इन्फेक्शन होतं. आतड्यांना सूज येते. पोटात असह्य दुखल्यामुळे तनुजा यांना लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. रुग्णालयातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तनुजा आता स्वस्थ असून एक आठवड्या देखरेखीनंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल. रुग्णालयात जाऊन काजोल आपल्या आईची काळजी घेत आहे.

...म्हणून मार्वलच्या थोरने आपल्या मुलीचं नाव ठेवलं ‘इंडिया’

हृतिक रोशनच्या बहिणीची तब्येत बिघडली, या मानसिक आजाराने ग्रासलं

नुकताच काजोलने आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तनुजा फार अशक्त दिसत आहेत. पटकन त्या तनुजा आहेत हे कळूनही येत नाही. अशक्तपणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो. पण असे असले तरी त्यांच्या मनोबलात तसूभरही फरक पडलेला नाही. त्यांचं मोहक हसू यावर उत्तर आहे. आईसोबतचा फोटो शेअर करत काजोलने लिहिले की, ‘ज्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली त्या सर्वांचे मी आभार मानते. हे हसू जे तुम्हाला दिसतंय ते आभाराचं हसू आहे.’

Bigg Boss Marathi 2- दुसऱ्याच आठवड्यात मैथिली जावकर घराबाहेर

VIDEO : पुण्यात मुसळधार; अनेक रस्त्यांवर साचलं पाणी

First published: June 10, 2019, 7:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या