मुंबई, 02 जुलै- बॉलिवूड आणि क्रिकेटचं किती अतुट नातं आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. आतापर्यंत असे अनेक खेळाडू आणि कलाकार आपण पाहिले ज्यांच्यात घट्ट मैत्री होती. यात जर पहिलं नाव घ्यायचं झालं तर युवराज सिंग आणि अंगद बेदी. युवराजने काही दिवसांपूर्वी त्याच्या निवृत्तीची पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये क्रिडा क्षेत्रासह बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. या पार्टीत आलेल्या पाहुण्यांना एका व्यक्तिची अनुपस्थिती जाणवत होती ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीची. युवराजने अंगद बेदी आणि नेहा धुपियाला का नाही बोलावले हा प्रश्न सर्वांना पडला होता. खऱ्या आयुष्यात युवराज सिंग आणि अंगद बेदी जिगरी दोस्त होते. मात्र गेल्या वर्षभरात या दोघांनी एकमेकांना भेटणं तर सोडाच पण पाहिलंही नाही.
मुंबईच्या पावसात अडकली अभिनेत्री, या हिरोने वाचवले प्राण
अंगद आणि नेहाच्या लग्नानंतर दोघांच्या मैत्रीत फूट पडली. नेहा आणि अंगदलने गेल्या वर्षी १० मे रोजी लग्न केलं. त्या दोघांमध्ये असं काय झालं की बालपणाची मैत्री एका दिवसात तुटली हे जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. त्यातही युवराजने दिलेल्या पार्टीत त्याची एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा पोहोचली होती. पण अंगद कुठेच दिसत नव्हता. यामुळेच चर्चेला अजून उधाण आलं.
हिमेश रेशमियाच्या गाडीला अपघात, ड्रायव्हर जखमी
एका एण्टरटेनमेन्ट वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, युवराजने अंगद आणि नेहाला त्याच्या पार्टीला बोलावलच नव्हतं. असं म्हटलं जातं की, २०१४ मध्ये युवराज आणि नेहा एकमेकांना डेट करत होते. जेव्हा अंगदने नेहाशी लग्न केलं तेव्हा युवराजला सांगितलंच नाही. याच गोष्टीचा राग युवराजला आला. फ्रेंडशिप डेला युवराजने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यात त्याने लिहिले की, ‘मला आज कळलं की काल फ्रेंडशिप डे होता. ‘आयुष्यभराचा अनुभव घेतल्यानंतर मला आता फक्त एवढंच सांगायचं आहे की, माझं माझ्या कुत्र्यावर प्रेम आहे. तुम्ही जगता आणि तुम्ही शिकत जाता.’ नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये युवराजच्या या पोस्टला अंगदने मुर्खपणा म्हटलं होतं. अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांनी दिल्लीतील एका गूरुद्वारात कोणालाही न सांगता अचानक लग्न केलं होतं. याबद्दल स्वतः नेहाने तिच्या सोशल मीडियावर माहिती दिली होती. ट्वीटमध्ये नेहा म्हणाली की, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय, मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केलं.’
टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर कमेंट करणं पडलं महाग, ट्रोल झाली अभिनेत्री
VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







