मुंबई, 02 जुलै- बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाच्या गाडीचा अपघात झाला असून यात हिमेशचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. स्पॉटबॉयईने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हिमेशचा ड्रायव्हर राम रंजनला गंभीर दुखापत झाली आहे. नेमका हा अपघात कसा झाला हे अजून कळलं नसून हिमेशने अपघातानंतर पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ‘ज्या गाडीचा अपघात झाला तो त्या गाडीत नव्हता. तसेच त्याचा चालक गंभीररित्या जखमी झाला नसून त्याला छोटीशी दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो ठीक आहे.’ टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर कमेंट करणं पडलं महाग, ट्रोल झाली अभिनेत्री यापुढे हिमेश म्हणाला की जो ड्रायव्हर जखमी झाला तो त्याचा वडिलांची गाडी चालवतो. सध्या हिमेश सोनी वाहिनीवरील सुपर स्टार सिंगर या रिअलिटी शोचा जज आहे. हिमेशसोबत या शोमध्ये अलका याग्निक आणि जावेद अली हेही जज आहेत. याआधी हिमेशने सारेगामापा लिटिल चॅम्प्स, द वॉइस ऑफ इंडिया किड्स या शोचा जज होता. हिमेश हे बॉलिवूडमधील नावाजलेलं नाव आहे. सलमान खानने हिमेशला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला आहे. हिमेशने सलमानच्या जब प्यार किया तो डरना क्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. रिअलिटी शोशिवाय हिमेश सिनेमांमध्येही सक्रिय आहे. सूर्यवंशी आणि गुडन्यूज या आगामी सिनेमांचा तो संगीत दिग्दर्शक आहे. हिमेशने तेरा सुरूर, आप का सुरूर, कर्ज, रेडिओ, खिलाडी ७८६ सिनेमांमध्ये काम केलं आहे. रिंकूचे हे फोटो होतायेत व्हायरल, दिसते बोल्ड अँड ब्युटिफुल VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







