मुंबई 17 जुलै: छोटी सरदारनी (Choti Sarrdaarni) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली युवलिन कौर (Yuvleen Kaur) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने या मालिकेत साकारलेली जीतो ही भूमिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. मात्र जीतोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. यापुढे युवलिन ही भूमिका साकारताना दिसणार नाही. (Yuvleen Kaur quit Choti Sarrdaarni) कारण तिने छोटी सरदारनी या मालिकेला कायमचा रामराम ठोकला आहे. परिणामी तिच्या जागी आता दुसऱ्या एका अभिनेत्रीची निवड केली जाणार आहे.
छोटी सरदारनी या मालिकेत येत्या काळात मोठा बदल होणार आहे. मालिकेत एक मोठा ट्विस्ट आणण्यासाठी निर्मात्यांनी टाईम लॅपचा वापर केला. म्हणजेच काळ आता पुढे गेला आहे. तरुण व्यक्तिरेखा आता जेष्ठांच्या भूमिकेत झळकणार आहेत. परंतु हा बदल युवलिनला मात्र रूचलेला नाही. वयाच्या 23 व्या वर्षी तिला आईची भूमिका साकारायची नाही. त्यामुळे तिने मालिकेला रामराम ठोकला आहे.
निक्की तांबोळी कॅज्युअल डेटिंगला वैतागली; आता घेतेय अशा बॉयफ्रेंडचा शोध
View this post on Instagram
आमिर-किरण यांनी का घेतला घटस्फोट? अखेर समोर आलं सत्य
टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत युवलिननं आपली नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “मला करिअरच्या सुरुवातीस आईच्या भूमिका साकारायच्या नाही. त्यामुळे माझ्या करिअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. आपली TV इंडस्ट्री अत्यंत साचेबद्ध पद्धतीने काम करते. एकदा का तुमच्यावर शिक्का मारला तर तो पुसून काढायला अनेक वर्ष लागतात. मला तरुण ग्लॅमरस भूमिका साकारायच्या आहेत. सतत रडणाऱ्या बाईची भूमिका साकारण्यात मला रस नाही. त्यामुळे मी छोटी सरदारनी मालिकेला रामराम ठोकला.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actress, TV serials