निक्की तांबोळी कॅज्युअल डेटिंगला वैतागली; आता घेतेय अशा बॉयफ्रेंडचा शोध
निक्की आता कॅज्युल डेटिंग करून कंटाळली आहे. आतापर्यंत तिने अनेक मित्रांसोबत डेटिंग केली.
|
1/ 7
बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून नावारूपास आलेली निक्की तांबोळी अभिनयापेक्षा सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहू लागली आहे.
2/ 7
आधी ती कुमार सानू यांचा मुलगा जान कुमारला डेट करत असल्याची चर्चा होती. अन् आता ती गायक टोनी कक्करमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
3/ 7
परंतु अलिकडेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या रिलेशनशिपवर भाष्य केलं. सोबतच कशा प्रकारचा बॉयफ्रेंड हवा याबाबतही खुलासा केला.
4/ 7
निक्की आता कॅज्युल डेटिंग करून कंटाळली आहे. आतापर्यंत तिने अनेक मित्रांसोबत डेटिंग केली. परंतु आता तिला जोडीदार शोधण्याचे वेध लागले आहेत.
5/ 7
निक्कीला आता सिरिअस डेटिंग करायची आहे. तिला आता आयुष्यात सेटल व्हायचं आहे. तिला राणीसारखा ठेवेल अशा राजकुमाराचा शोध निक्की घेतेय.
6/ 7
तिने आतापर्यंत कोणासोबतही रिलेशनशिप ठेवलेलं नाही. ज्या कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं जातंय ते सर्व तिचे केवळ चांगले मित्र आहेत. असंही निक्कीनं या मुलाखतीत स्पष्ट केलं.
7/ 7
निक्कीनं आतापर्यंत कंचना 3 आणि त्रिपरा मेसम या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बिग बॉसमुळे ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली.