मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आमिर-किरण यांनी का घेतला घटस्फोट? अखेर समोर आलं सत्य

आमिर-किरण यांनी का घेतला घटस्फोट? अखेर समोर आलं सत्य

आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं.

आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं.

आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं.

मुंबई 17 जुलै: आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. (Aamir Khan Divorced Kiran Rao) आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेत असल्याची धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्यांच्या घटस्फोटामुळे एकच खळबळ उडाली. प्रत्येक जण या मागचं कारण विचारू लागला. दरम्यान काहींनी अभिनेत्री फातिमा सना शेखला या घटस्फोटासाठी जबाबदार धरलं तर काहींनी आमिरच्या स्पष्टवक्तेपणाला. (Why Aamir Divorced Kiran) मात्र अखेर त्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर आलं आहे.

बॉलिवूड इनसाइडर’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आमिर आणि किरण हे दोघेही गेल्या काही वर्षात लग्न या संकल्पनेच्या पलिकडे विचार करत होते. त्यांच्यात कुठलेही वाद किंवा मतभेद नव्हते. परंतु आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र बदलला होता. त्यामुळे यापुढे केवळ मित्र म्हणूनच एकत्र राहू असा विचार त्यांनी केला. अर्थात ही प्रक्रिया दिसते तितकी सोपी नव्हती. त्यांना आपली मानसिक तयारी करायला जवळपास 2 वर्ष लागली. 2019 पासून ते विभक्त होण्याचा विचार करत होते. अखेर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.”

‘बॉलिवूड हा केवळ ग्लॅमरचा भ्रम’; इलाक्षीनं सांगितलं मराठीत पदार्पण करण्याचं खरं कारण

" isDesktop="true" id="580622" >

लिहिण्यासाठी काहीच नाही म्हणणारे बिग बी का झाले ट्रोल?

किरणच्या आधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान यांचं लग्न झालं. लगान या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. केवळ एका फोनच्या संभाषणानंतर आमिर खान आणि किरण राव मनाने एकमेकांच्या जवळ आले होते. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली अन् मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं.

First published:

Tags: Aamir khan, Divorce, Love story