मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Honey Singh: यो यो हनी सिंह करणार जोरदार कमबॅक; पण परत मिळेल का तोच स्टारडम?

Honey Singh: यो यो हनी सिंह करणार जोरदार कमबॅक; पण परत मिळेल का तोच स्टारडम?

 रॅपर यो यो हनी सिंह गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या खाजगी कारणांमुळे मीडियापासून दूर आहे.अनेकांनी हनी सिंहची कारकीर्द संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हनी सिंह पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 सप्टेंबर-  रॅपर यो यो हनी सिंह गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या खाजगी कारणांमुळे मीडियापासून दूर आहे.अनेकांनी हनी सिंहची कारकीर्द संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हनी सिंह पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार आहे.पंजाबी गायक हनी सिंहने हनी 3.0 अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. लवकरच या अल्बमची गाणीही रिलीज होणार आहेत. मात्र या अल्बमच्या घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

हनी सिंहने त्याच्या नवीन अल्बम 3.0 ची खास झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गाण्यांची झलक पाहून असे वाटत आहे की, हनी सिंह त्याच्या पूर्ण स्वॅगसह पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. हनी सिंहने आत्तापर्यंत जितकी गाणी गायली आहेत. त्याला लोकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. खासकरुन तरुण पिढीने त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. तसेच हनी सिंहच्या गाण्यांवर आजही लोक थिरकू शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे हनी सिंह काही काळ लाइम लाईटपासून दूर होता. आता हनी सिंग पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार आहे.त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये पुन्हा तोच उत्साह पाहायला मिळत आहे.

हनी सिंह खूप दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर असल्याने चाहते त्याला प्रचंड मिस करत होते. हनी सिंहच्या नवीन अल्बम 3.0 च्या घोषणेनंतर चाहते देखील खूप उत्सुक दिसत आहेत. सोशल मीडियावरही चाहत्यांनी हनी सिंहला लवकर नवीन गाणी लाँच करण्याचं आवाहन केलं आहे. आता हनी सिंह पुन्हा एकदा त्याच्या 3.0 अल्बममुळे चर्चेत आला आहे.त्याला पुन्हा तेच प्रेम, तोच स्टारडम मिळतो का? पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(हे वाचा:Samantha Prabhu: समंथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; पहिल्याच चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका )

हनी सिंह घटस्फोट-

गेल्या काही दिवसांपासून हनी सिंह आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेतआहे . नुकतंच त्याचा घटस्फोट झाला आहे. हनी सिंह आणि त्याची पत्नी शालिनी यांच्यात वाद सुरु होता. प्रदीर्घ वादानंतर दोघांनी संमतीने घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटामुळे हनी सिंह बराच चर्चेत राहिला आहे. घटस्फोटानंतर हनी सिंहने पत्नीला पोटगी म्हणून एक कोटी रुपयेही दिले आहेत. याबाबत माध्यमांमध्येही अनेक वृत्त समोर आले होते.

First published:

Tags: Bollywood News, Singer