मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Samantha Prabhu: समंथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; पहिल्याच चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

Samantha Prabhu: समंथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; पहिल्याच चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

 समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच ती साऊथमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच ती साऊथमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच ती साऊथमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 सप्टेंबर-   समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच ती साऊथमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. आणि आता फक्त साऊथमध्येच नव्हे तर जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक अपडेटकडे चाहते लक्ष लावून असतात. अभिनेत्री सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सतत अभिनेत्रीबाबत कोणतं ना कोणतं वृत्त समोर येत असतं. आजही असंच काहीसं झालं आहे. समंथच्या चाहत्यांना तिला बॉलिवूडमध्ये पाहण्याची इच्छा आहे. चाहत्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान 'द फॅमिली मॅन 2' या वेबसीरिजमध्‍ये समंथा रुथ प्रभूला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यामुळे अभिनेत्रीला बॉलिवूड चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येत आहेत. तिने दिनेश विजानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यात स्वारस्य दाखवल्याचं म्हटलंजात आहे . या चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे. 'स्त्री', 'भेडिया' आणि 'मुंझा' नंतर मॅडॉक फिल्म्सचा हॉरर-कॉमेडी क्षेत्रातील हा चौथा चित्रपट असेल.मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट निर्माते दिनेश विजन यांनी आयुष्मान खुरानासोबत त्यांच्या आगामी चित्रपटासाठी समंथा रुथ प्रभूशी संपर्क साधला होता. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे.आता या चित्रपटासाठी समंथा दिल्याचं म्हटलं जात आहे. परंतु अभिनेत्रीने याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय.

या चित्रपटाच्या माध्यमातून हॉरर-कॉमेडी चित्रपटाला हे कलाकार आणखी दमदार रुपात सादर करताना दिसणार आहेत. एका मीडिया पोर्टलच्या रिपोर्टनुसार, सामंथा रुथ प्रभू राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष्मान खुराना व्हॅम्पायरच्या भूमिकेत दिसणार आहे. अमर कौशिक या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर निरेन भट्ट पटकथा लिहिणार आहेत. या चित्रपटाची माहिती समोर येताच समंथाचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.

(हे वाचा:Dream Girl 2 Teaser : ठरलं! 'या' दिवशी येणार आयुष्मान खुरानाची 'ड्रीम गर्ल 2'; इथं पाहा तारीख )

या मीडिया रिपोर्टमध्ये तथ्य असेल तर, समंथा आणि आयुष्मानला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहणं खरोखरच रंजक असणार आहे. समंथा रुथ प्रभूचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट असेल. साहजिकच अभिनेत्रीसोबत तिचे चाहतेही या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार असल्याची चर्चा आहे. समंथाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, South actress