जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तयार राहा हा शेवटचा आहे…’; स्वीटूच्या नव्या फोटोंमुळे चाहते पडले गोंधळात

‘तयार राहा हा शेवटचा आहे…’; स्वीटूच्या नव्या फोटोंमुळे चाहते पडले गोंधळात

‘तयार राहा हा शेवटचा आहे…’; स्वीटूच्या नव्या फोटोंमुळे चाहते पडले गोंधळात

यावेळी देखील तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत. मात्र हे फोटो त्यावर दिलेल्या कॅप्शनमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 19 जुलै**:** ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेतून नावारुपास आलेली अन्विता फलटनकर (Anvita Phaltankar) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मालिकेसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Anvita Phaltankar Photo viral) गंमतीशीर फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यामातून ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते. यावेळी देखील तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत. मात्र हे फोटो त्यावर दिलेल्या कॅप्शनमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अन्विताने लाल साडीमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावर तिने “होय! गालामुळे डोळे लपतायत, मला माहितेय!  तरीपण तयार हा शेवटचा आहे” असं कॅप्शन दिलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान हा शेवटचा म्हणजे काय? आम्हाला तुझे आणखी फोटो पाहायचे आहेत. असं म्हणत काही चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुकही केलं आहे. वनिता खरात कशी झाली हास्यक्वीन? त्या न्यूड फोटोमुळे उडवली होती खळबळ

जाहिरात

मोनालिसाचं बेडरूम आहे खूपच सिंपल; पाहा आलिशान घराचे Inside Photos झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यातील स्वीटू आणि ओमच्या प्रेमाने तर चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे. मालिकेत हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. ओमने तर वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र या दोघांच्या मध्ये असणाऱ्या आर्थिक दरीमुळे स्वीटूच्या आईने तिला आपलं प्रेम व्यक्त करण्यापासून परावृत्त केलं. त्याचबरोबर ओमच्या बहिणीने सुद्धा वेळोवेळी या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सर्वांमध्ये स्वीटूने आपल्या प्रेमाचा त्याग केला होता. सध्या मालिकेत हेच कथानक चालू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात