नजर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मोनालिसा छोट्या पडद्यावरील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
तिने आपल्या आलिशान बेडरूमचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाचे मूळ नाव अंतरा बिस्वास आहे. 21 नोव्हेंबर 1982 रोजी कोलकातामध्ये बंगाली कुटुंबात तिचा जन्म झाला.
मोनालिसाने उडिया म्यूजिक व्हिडीओतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2008 साली 'भोले शंकर' या भोजपुरी चित्रपटातून मोनालिसानं सिनेक्षेत्रात पदार्पण केलं होतं.