मुंबई 19 जुलै: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली वनिता खरात (Vanita Kharat) छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या युनिक टाईमिंगने प्रेक्षकांना चकित करणाऱ्या वनिताने मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. आज तिचा वाढदिवस आहे. (Vanita Kharat birthday) 29 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रुपेरी पडद्यावर स्कीट करत असताना अनेकदा वनिताच्या वजनदार शरीराची खिल्ली उडवली जाते. यामुळे प्रेक्षक खळखळून हसतात. (Vanita Kharat Nude photoshoot) मात्र काही दिवसांपूर्वी तिने न्यूडफोटोशूट करून एकच खळबळ उडवली होती.
मोनालिसाचं बेडरूम आहे खूपच सिंपल; पाहा आलिशान घराचे Inside Photos
वनिताने का केलं होतं न्यूड फोटोशूट?
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत वनिताने आपल्या न्यूड फोटोशूटवर भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती, “वजन वाढल्यामुळे स्वत:ला कमी लेखणारे अनेक जण आपल्या सभोवताली पाहायला मिळतात. वजन जास्त आहे, म्हणजे आपण सुंदर दिसत नाही अशी अनेकांची समजूत झालेली असते. त्यामुळे अनेकदा त्यांच्यातील आत्मविश्वास कमी असलेला दिसतो. यात पुरुष मंडळीही अपवाद नाहीत. मात्र, यात स्त्री वर्गामध्ये वजनाविषयी अनेकदा अस्वस्थता पाहायला मिळते. त्यामुळे मला त्यांच्या याच भावनेला, विचारसरणीला छेद द्यायचा होता”
तारक मेहतामध्ये All Is Not Well? अंजली भाभी ऑफस्क्रीन कोणाशी बोलत नाही
View this post on Instagram
मुंबईतील किर्ती कॉलेजमध्ये शिकत असताना एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत वनिताने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याच दरम्यान तिला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात झळकण्याची संधी मिळाली. या विनोदी स्कीट स्पर्धेत ती विजेता ठरली होती. अन् त्यानंतर मागे वळून तिने पाहिलेच नाही. तिचा अभिनय पाहून ‘कबिर सिंग’ या चित्रपटातही तिची निवड करण्यात आली. सध्या ती छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.