अन्विता फलटणकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये अन्विता ‘झोंका हवा का’ प्रसिध्द गाण्यावर डान्स करत आहे. अन्विताच्या डान्सने चाहत्यांचं मन मोहून घेतलं आहे. अन्विताच्या त्या हळुवार अदाकारीने चाहत्यांना वेड केलं आहे. अन्विताची प्रत्येक स्टेप चाहत्यांच्या मनाला भिडत आहे. अन्विताच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचंसुद्धा कौतुक होतं आहे. चाहते कमेंट्स आणि लाईक्स करून अन्विताला दाद देत आहेत. (हे वाचा: 'साथ निभाना साथिया' फेम कोकिला रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत! ) अन्विता उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र ती एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. अन्विताचे डान्स व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. कधी ती आपल्या सह कलाकारांसोबत तर कधी एकटी धम्माल डान्स करत असते. अन्विता बऱ्याचवेळा आपल्या सेटवर ऑफस्क्रीन मस्ती करत असते. मालिकेमध्ये साधी भोळी दिसणारी स्वीटू रियल लाईफमध्ये मात्र खुपचं बिनधास्त आणि स्टाईलिश आहे. तसेच अन्विता ‘टाईमपास’ या प्रसिद्ध चित्रपटात झळकली होती. (हे वाचा:VIDEO: स्वप्नील जोशीचं 'समांतर 2' चॅलेंज; चाहत्यांना केलं खास आवाहन ) सध्या मालिकेमध्ये ओम स्वीटूच्या आईकडे तिचा हात मागायला आला आहे. मात्र नलू मावशी तिला दाद देत नाहीय. त्यामुळे मालिकेत नेमकं काय होणार ओम आणि स्वीटूचं लग्न कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.