• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: स्वप्नील जोशीचं 'समांतर 2' चॅलेंज; चाहत्यांना केलं खास आवाहन

VIDEO: स्वप्नील जोशीचं 'समांतर 2' चॅलेंज; चाहत्यांना केलं खास आवाहन

गेल्यावर्षी म्हणजेच मार्च 2020 मध्ये ‘समांतर’ ही रहस्यमयी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 • Share this:
  मुंबई, 6 जुलै-  मराठीतील बहुप्रतीक्षित वेबसिरीज ‘समांतर 2’(Samantar 2) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्या भागाप्रमाणे यावेळीही प्रत्येक एपिसोडने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. चक्रपाणीचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वांना उत्सुकता लागली आहे. तत्पूर्वी या वेबसिरीजचा बिहाइंड द सीन व्हिडीओ व्हायरल होत (Viral Video) आहे. जाणून घेऊया या व्हिडीओबद्दल
  नुकताच Mx Player ‘समांतर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आत्ता या भागानेसुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळवायला सुरुवात केली आहे. तसेच वेबसिरीजच्या व्यतिरिक्त सेटवरील विविध फोटो आणि व्हिडीओसुद्धा सध्या व्हायरल होतं आहेत. नुकताच अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ बिहाइंड द सीन व्हिडीओ आहे. यामध्ये स्वप्नील जोशी एक सीन देण्यामध्ये व्यग्र असलेला दिसत आहे. हा सीन एका जत्रेतील पाळण्यामध्ये शूट केला जात आहे. आणि स्वप्नील जोशी आपला कोणता लुक हवाय याबद्दल विचारणा करत आहे. (हे वाचा: HBD: 'या' प्रसिद्ध क्रिकेटरने रणवीरला कोचिंग देण्यास दिला होता नकार ) महत्वाचं म्हणजे स्वप्नीलने हा व्हिडीओ शेयर करत, एक कॅप्शन लिहिलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, ‘माझ्या या लुकचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि तो एका योग्य कॅप्शनसह तुमच्या इन्स्टाग्राम स्टोरीला अपलोड करा. या कॅप्शनमुळे चाहते खुपचं उत्साही झाले आहेत. चक्क स्वप्नीलनेच हे आवाहन केल्यामुळे ते आनंदी झाले आहेत. (हे वाचा:5 वर्षांनी करण जोहर करतोय सिनेमा; शबाना, जया यांच्यासोबत धर्मेंद्र करणार रोमान्  ) गेल्यावर्षी म्हणजेच मार्च 2020 मध्ये ‘समांतर’ ही रहस्यमयी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सतीश राजवाडे यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केल होतं. तर स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि नितीश भारद्वाज यांनी यात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ही वेबसिरीज प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. याचं वेबसिरीजचा दुसरा भाग म्हणजे ‘समांतर 2’ होय. यामध्ये अभिनेत्री सई ताम्हनकरची नव्याने एन्ट्री झाली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: