'साथ निभाना साथिया' मालिकेतील कोकिलाबेन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री रूपल पटेलबद्दल एक महत्वाची बाब समोर आली आहे. त्या रुग्णालयात दाखल झाल्याचं समजलं आहे. टेली चक्करच्या रिपोर्टनुसार त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाहीय.
रूपल पटेल रुग्णालयात दाखल झाल्याचं समजताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे.
मात्र रूपल पटेल यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आलं आहे, याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती समजलेली नाहीय.
रूपल पटेल या शगुन, जाने क्या बात हुई, मनमोहिनी, ये रिश्ते हैं प्यार के यांसारख्या मालिकांमध्ये दिसून आल्या होत्या.