मुंबई 17 जुलै**: ‘येऊ कशी तशी मी नांदायला’** (Yeu Kashi Tashi Me Nandayla) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. श्रीमंत हिरो जेव्हा गरीब तरुणीच्या प्रेमात पडतो तेव्हा काय घडतं? या कथानकाभोवती ही मालिका फिरताना दिसत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार आपापल्या भूमिका योग्य रितिने साकारतायेत. मात्र यामध्ये मोमो (Momo) या व्यक्तिरेखेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री मिरा जगन्नाथ (Mira Jagannath) हिने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तिने ही भूमिका इतक्या उत्तम प्रकारे साकारली की तिला आता खऱ्या आयुष्यात देखील मोमो अशीच हाक मारली जाते. आता मोमोमधून बाहेर पडणं अशक्य अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मिरानं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने मोमो या व्यक्तिरेबाबत आलेला अनुभव सांगितला. ती म्हणाली, “सुरुवातीला मोमो ही केवळ एक ग्लॅमरस दिसणारी आणि थोडासा वेडसरपणा असणारी एक अमेरिकन रिटर्न मुलगी होती. परंतु काळानुरुप लेखकांनी या व्यक्तिरेखेत काही बदल केले. त्यामुळे मोमो आता मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसतेय. मी अत्यंत प्रामाणिकपणे ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतेय. कारण हे काम मिळवण्यासाठी मला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे.” ‘अशा भूमिका नकोच, कारण…’; आई व्हायचं नव्हतं म्हणून अभिनेत्रीनं सोडली मालिका
निक्की तांबोळी कॅज्युअल डेटिंगला वैतागली; आता घेतेय अशा बॉयफ्रेंडचा शोध पुढे मिरा म्हणाली, “मोमो या व्यक्तिरेखेमध्ये आता मी पार गुंतून गेले आहे. दररोज मालिकेच्या निमित्तानं मला मोमोसारखं बोलावं लागतं. पण खरं सांगायचं झालं तर आता वैयक्तिक आयुष्यात देखील मी तिच्यासारखीच वागू लागली आहे. अनेकदा कुटुंबीय मला भूमिकेतून बाहेर ये असं ओरडतात. मला असं वाटतंय मोमो आता माझ्या व्यक्तिमत्वात पुर्णपणे भीनली आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेतून बाहेर पडणं आता अशक्य वाटतंय.”

)







