• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'येऊ कशी तशी...' ओम स्वीटूच्या कुटुंबाला परत मिळवून देणार त्यांच्या हक्काचं घर

'येऊ कशी तशी...' ओम स्वीटूच्या कुटुंबाला परत मिळवून देणार त्यांच्या हक्काचं घर

मालिकेतील स्वीटू आणि ओमच्या लव्हस्टोरीने सर्वांनाचं आकर्षित करून घेतलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 6 ऑगस्ट- येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेमध्ये ओम (Om), स्वीटू(Sweetu) आणि तिच्या कुटुंबाला त्यांचा आनंद परत मिळवून देणार आहे. आपलं घर सोडून बाहेर भटकणाऱ्या साळवी कुटुंबाला ओमने त्यांच्या हक्काचं घर परत मिळवून दिलं आहे. तसेच मालविकाला स्वीटूच्या कुटुंबाची माफीसुद्धा मागायला लावली आहे. त्यामुळे स्वीटू आणि तिच्या कुटुंबाला त्यांचा मानसन्मान परत मिळाला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

  झी मराठीवर प्रक्षेपित होणारी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मराठी मालिका खुपचं लोकप्रिय झाली आहे. सुरुवातीपासूनचं मालिकेला मोठी पसंती मिळत आहे. मालिकेतील स्वीटू आणि ओमच्या लव्हस्टोरीने सर्वांनाचं आकर्षित करून घेतलं आहे. त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये मालविका नावाचं मोठं वादळ आहे. मालविकाही ओमची बहीण आहे. स्वीटूच्या मध्यमवर्गीय असण्याने तिला अडचण आहे. त्यामुळे ती आपल्या भावासाठी एका मोठ्या घरातील मुलीची अपेक्षा ठेवत आहे. आणि म्हणूनचं ती स्वीटू आणि ओमला वेगळं करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. ती जाणूनबुजून स्वीटूच्या कुटुंबाला त्रास देत आहे. (हे वाचा:56 हजार लोककलावंतांना मोठा दिलासा; मिळणार प्रत्येकी 5 हजारांची मदत ) मोहितने स्वीटूच्या भावाचा म्हणजेच चीन्याचा अपघात घडवून आणला होता. त्याच्या ऑपरेशनसाठी मोठा खर्च आला होता. त्यावेळी मालविकाने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घराची कागदपत्रे हडप केली होती. आणि त्या परीस्थितीचा फायदा घेत स्वीटू आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला घरातून हाकलून काढत घर जपत केलं होतं. (हे वाचा:आणखी एका मराठी अभिनेत्रीला 'पॉर्न' फिल्मच्या जाळ्यात ओढण्याचा झाला प्रयत्न) मात्र मालविकाचं हे कारस्थान ओमच्या समोर येताच, तिने स्वीटू आणि तिच्या कुटुंबाला त्यांचा हक्क त्यांचं घर आणि त्यांचा मानसन्मान परत मिळवून दिला आहे. सध्या हा मालिकेचा नवा प्रोमो जोरदार व्हायरल होतं आहे. लवकरच आपल्याला मालिकेत हा भाग पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आत्ता तरी स्वीटू आणि ओमचं नातं सर्वांना मान्य होईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: