• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 56 हजार लोककलावंतांना मोठा दिलासा; मिळणार प्रत्येकी 5 हजारांची मदत

56 हजार लोककलावंतांना मोठा दिलासा; मिळणार प्रत्येकी 5 हजारांची मदत

नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानामध्ये सांस्कृतिक विभागाची बैठक पार पडली.

 • Share this:
  मुंबई, 6 ऑगस्ट-  कोरोनाने सर्वांनाचं अक्षरशः घाईला (Corona Pandemic) आणलं आहे. कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊनसारखे(Lockdown) कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे सर्वचं उद्योगधंदे बंद आहेत. तसेच सर्व शुटींग, थियेटरसारखे सर्व मनोरंजन क्षेत्रावरसुद्धा कडक निर्बंध लागले आहेत. आणि म्हणूनचं लोककलावंतांना(Artists) याचा मोठा फटका बसला आहे. दिवसेंदिवस त्यांची आर्थिक स्थिती खालावत आहे. हिचं बाब लक्षात घेऊन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये तब्बल 28 हजार कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. यानुसार, राज्यातील 56 हजार लोककलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची दिलासा देणारी मदत करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानामध्ये सांस्कृतिक विभागाची बैठक पार पडली. (हे वाचा: गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस यांचं नवं गाणं, लवकरच होणार रिलीज) गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मनोरंजक्षेत्रसुद्धा बंद ठेवण्यात आलं आहे. यामध्ये लोककलेद्वारे आपला उदरनिर्वाह करणारे कलाकार आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेने सर्व लोककलावंताना मोठा दिलासा मिळणार आहे. (हे वाचा:जेनेलिया नव्हे तर 'हे' आहे माझ्या बायकोचं नाव; रितेशने केला खुलासा  ) राज्यात असणाऱ्या कलाकारांची संख्या- फक्त मुंबई आणि मुंबईच्या जवळपास असणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच पुणे याठिकाणी जवळजवळ आठ हजार कलाकार आहेत. तसेच संपूर्ण राज्यातील इतर जिल्ह्यांत पाहिलं असता, तब्बल 48 हजार कलाकार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: