बिग बॉस मराठी नंत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मेघा धाडेने नुकताच एक खलबळजनक खुलासा केला आहे. तिच्यासह अनेक मराठी अभिनेत्रींना पॉर्नच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला होता. असं तिने म्हटलं आहे. पाहा मेघा काय म्हणाली.
2/ 9
सध्या राज कुंद्रा प्रकरणामुळे पॉर्नचं रॅकेट बाहेर येताना दिसत आहे. सिनेसृष्टीच्या आड पॉर्नचे काळे धंदे चालत असल्याचंही उघड झालं आहे. अनेक नवोदित कलाकारंना या जाळ्यात ओढलं जातं. तसेच मराठी अभिनेत्रींनाही त्यात ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. असं मेघा म्हणाली.
3/ 9
एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीत मेघाने हा खुलासा केला आहे. तिने म्हटलं की, तिलाही अशा बोल्ड सीनच्या ऑडिशनची ऑफर आली होती. तर ऑडीशनमध्येच हे बोल्ड सीन करायला सांगितले होते.
4/ 9
हॉलिवूड चित्रपट किंवा वेबसीरिजच नाव सांगून अशा ऑडीशन्स घेतल्या जातात तर नवोदीत अभिनेत्रींना या जाळ्यात ओढलं जातं असंही ती म्हणाली.
5/ 9
मेघाने सांगितलं की, तिला चार वर्षांपूर्वी अशी ऑफर आली होती. व एका हॉलिवूड सीरिजची ऑपर असल्याचं सांगण्यात आलं होतं.
6/ 9
पण आपण वेळीच सावध झाल्याचं तिने म्हटलं. व तिचा पती सायबर डिपार्टमेंटला काम करतो. त्यामुळे लगेचच तिने तक्रार नोंदवली. असंही ती म्हणाली.
7/ 9
पण या केसचं पुढे काहीही झालं नसल्याचं ती म्हणाली. तसेच तिच्याशिवाय अनेक मराठी अभिनेत्रींना अशाप्रकारच्या ऑफर्स आल्या होत्या. असंही तिने म्हटलं.
8/ 9
अभिनेत्रींनी पुढे येऊन बोलायला हवं. तसेच केवळ मोठ नाव आणि पैसे पाहून हुरळून न जाता योग्य ती चौकशी करावी असा सल्लाही तिने दिला.
9/ 9
मेघा ही बिग बॉस मराठीची विजेती ठरली होती. त्यानंतर तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. हिंदी बिग बॉसमध्येही तिने हजेरी लावली होती.