मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'ये दिल आशिकाना' फेम करण नाथचं माधुरीसोबत खास कनेक्शन; एका हिट नंतर कुठे गायब झाला अभिनेता?

'ये दिल आशिकाना' फेम करण नाथचं माधुरीसोबत खास कनेक्शन; एका हिट नंतर कुठे गायब झाला अभिनेता?

करण नाथ

करण नाथ

.ये दिल आशिकाना' हा चित्रपट खूप हिट ठरला होता.एक हिट चित्रपट देऊनही त्याला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करता आलं नाही. आता हा अभिनेता कुठे गायब झाला जाणून घ्या...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च :  तुम्ही 90 च्या दशकातील सिनेप्रेमी असाल, तर तुम्हाला त्यातील एक चित्रपट आणि त्यातील गाणी नक्कीच आठवत असतील.  त्या काळात एक गाणे खूप हिट झाले, ज्याचे बोल होते 'उठा ले जाऊंगा..तुझे में डोली में..' आणि 'ये दिल आशिकाना...ये दिल आशिकाना', जे तुम्ही कधीतरी १०० टक्के ऐकलेच असेल. . 'ये दिल आशिकाना' चित्रपटातील हे गाणं होतं. हा चित्रपट तेव्हा खूप हिट ठरला होता. या चित्रपटातून करण नाथ या अभिनेत्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण एक हिट चित्रपट देऊनही  त्याला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करता आलं नाही. आता हा अभिनेता कुठे गायब झाला जाणून घ्या...

'मिस्टर इंडिया' चित्रपटात बालकलाकार म्हणून  करणने इंडस्ट्रीत पाउल ठेवले होते. त्यानंतर त्याने  'ये दिल आशिकाना' सारखा हिट सिनेमा दिला. करण नाथसाठी बॉलिवूड नवीन नव्हते. बॉलीवूड त्याला आधीच परिचित होतं. माधुरी दीक्षितसोबत त्यांचं खास नातं होतं. इतकंच नाही तर त्याचे मामा आणि मावशी आणि आजोबा देखील बॉलिवूडचे मोठे स्टार होते. पण एवढे होऊनही करण नाथ बॉलिवूडमध्ये चांगलं करिअर घडवू शकला नाही.

35 वर्षे नवऱ्यापासून दूर राहिली कपूर घराण्याची 'ही' सून; केवळ या स्टार लेकींसाठी सोसलं एवढं दुःख

करणने मिस्टर इंडियामध्ये 'जुगल'ची भूमिका साकारली होता.  'ये दिल आशिकाना' मधून पदार्पण केल्यानंतर करण 'श्श', 'एलओसी कारगिल' सारख्या अनेक चित्रपटात दिसला, पण त्याची प्रेक्षकांच्या मनावर तो आपल्या अभिनयाचा ठसा उमटवू शकला नाही. बिग बॉस च्या १५ व्या सीझनमध्ये देखील तो दिसला होता. पण तिथेही तो फारसा लोकप्रिय झाला नाही. तो शेवटचा 'गन्स ऑफ बनारस' या चित्रपटात दिसला होता.

करण नाथसाठी माधुरी दीक्षित त्याच्या बहिणीसारखी आहे. वास्तविक, करण नाथ हा रिक्कू म्हणजेच राकेश नाथ यांचा मुलगा आहे, ज्यांना चित्रपटसृष्टीतील लोक रिक्कू म्हणून ओळखतात. राकेश नाथ हे ९० च्या दशकात लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर होते आणि बराच काळ माधुरी दीक्षितचे मॅनेजर देखील होते. राकेश नाथ यांच्या पत्नीचे नाव रीमा राकेश नाथ होते. रीमा ही डीके सप्रू यांची मुलगी आहे, जे 50 ते 70 च्या दशकातील गाजलेले आणि लोकप्रिय अभिनेते होते. रीमाने माधुरी दीक्षित स्टारर 'साजन' या चित्रपटाची कथा लिहिली होती. राकेश आणि रीमा यांचे माधुरी दीक्षितसोबत इतके जवळचे नाते होते, म्हणूनच करण नाथ देखील माधुरीला बहीण मानतो  आणि तिला दीदी म्हणतो.

हिंदी आणि पंजाबी चित्रपटांची स्टार प्रीती सप्रू हि त्याची मावशी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारे तेज सप्रू हे करणचे मामा आहेत. करण नाथचे मामा आणि मावशी यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. 2020 मध्ये पुन्हा पुनरागमन करत 2020 मध्ये करण नाथने 'गन्स ऑफ बनारस' या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आणि त्यानंतर 'बिग बॉस OTT' मुळे चर्चेत राहिला. करण नाथ सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News