मुंबई, 07 डिसेंबर : सिनेमा, टीव्ही आणि सेलिब्रेटी यांच्याशी निगडीत कंटेट आणि माहितीसाठी IMDB हा जगातील लोकप्रिय आणि अधिकृत स्त्रोत समजला जातो. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत सगळ्या गोष्टींची माहिती IMDBवर मिळते. नुकतीचIMDBनं 2022च्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये साऊथ इंडियन कलाकार आणि बॉलिवूड कलाकार आमने सामने आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट पासून साऊथ अभिनेता धनुष पर्यंत टॉप 10 कलाकारांची नावं या यादीमध्ये आहेत. 2022मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार होण्यात कोण कोण यशस्वी ठरलं आहे पाहूया. यंदाची IMDB रँकिंग ही त्यांच्या साइटवर महिन्याला येणाऱ्या 200 मिलियन विझिटर्सच्या पेज व्ह्यूजवर आधारित आहे. म्हणजेच 200 मिलियन युझर्सनी या कलाकारांना सर्वाधिक सर्च केलं करत त्यांच्याबद्दल सर्वाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 2022मध्ये IMDBवर टॉप 10मध्ये असलेले भारतीय कलाकार हे IMDBच्या विकली रॅकिंग लिस्टमध्ये देखील टॉपमध्ये आहेत. हेही वाचा- Year End : RRR ते कांतारा, बॉलिवूडला दे धक्का अन् 2022मध्ये बॉक्स ऑफिसवर साऊथ सिनेमांचा डंका IMDBच्या टॉप 10 कलाकारांमध्ये अभिनेता आलिया भट्ट सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्री ठरली आहे. आलियानं 2022मध्ये गंगूबाई काठियावाडी सारखा हिट सिनेमा दिला. त्याचप्रमाणे RRR,ब्रम्हास्त्र सारख्या सिनेमातही तिनं काम केलं. तसंच हार्ट ऑफ स्टोन, वंडर वुमन या हॉलिवूड सिनेमांच शुटींग तिनं पूर्ण केलं आहे. 2022 वर्ष तिच्यासाठी सगळ्या अर्थानं खास ठरलं.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीएस 1 हा सिनेमा यंदा रिलीज झाला. या सिनेमातून ऐश्वर्या मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांसमोर आली. त्यानंतर या लिस्टमध्ये नॅशनल समांथा रूथ प्रभू ही चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर अभिनेता ऋतिक रोशन आहे. तर साऊथ अभिनेता धनुषनं नंबर वनची जागा पटकावली आहे. IMDBवरील 2022ची सर्वाधिक लोकप्रिय भारतीय अभिनेत्यांची पूर्ण यादी 1- धनुष 2-आलिया भट्ट 3- ऐश्वर्या राय बच्चन 4- राम चरण 5- समांथा रूथ प्रभू 6- ऋतिक रोशन 7- कियारा अडवाणी 8- ज्युनिअर एनटीआर 9- अल्ल अर्जुन 10-यश