Home /News /entertainment /

Bigg Boss15:'ये रिश्ता..'फेम शिवांगी जोशी-मोहसीन खानला बिग बॉससाठी मिळाली इतक्या कोटींची ऑफर!

Bigg Boss15:'ये रिश्ता..'फेम शिवांगी जोशी-मोहसीन खानला बिग बॉससाठी मिळाली इतक्या कोटींची ऑफर!

'ये रिश्ता क्या कहलाता है' (Ye Rishta Kya Kahalata Hai) या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) आणि मोहसीन खान(Mohasin Khan)हे दोन्ही कलाकार 'बिग बॉस 15'(Bigg Boss 15) मध्ये सहभागी होणार आहेत.

  मुंबई, 18 सप्टेंबर- 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Ye Rishta Kya Kahalata Hai) या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) आणि मोहसीन खान(Mohasin Khan) यांचा प्लॉट संपत आहे. त्यामुळे चाहते खूपच निराश झाले आहेत. लवकरच हे दोघे या मालिकेतून बाहेर पडणार आहेत. मात्र आत्ता अशा बातम्या समोर येत आहेत, की हे दोन्ही कलाकार 'बिग बॉस 15'(Bigg Boss 15) मध्ये सहभागी होणार आहेत. या दोघांनाही 'बिग बॉस'ची ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे. या दोन्ही कलाकारांची तगडी फॅनफॉलोइंग आहे. त्यामुळे मेकर्सना त्यांची भुरळ पडल्याचं म्हटलं जात आहे.
  स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, अभिनेता मोहसीन खान आणि शिवांगी जोशी यांना शोमेकर्सनी ४ कोटींची ऑफर दिली आहे. मात्र सध्या दोघीनींही काहीही निश्चित केलेलं नाहीय. या दोघीनींही याबद्दल अजूनही कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाहीय. 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा खुलासा काही दिवसांआधीच होतो. कारण या स्पर्धकांना काही दिवस आधी क्वारंटाईन केलं जात. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्पर्धकांनां क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. (हे वाचा:Bigg Boss OTT: आज रंगणार महाअंतिम सोहळा; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार शो) मोहसीन खान आणि शिवांगी जोशी यांची 'बिग बॉस' मध्ये एन्ट्री म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मेजवानीच असणार आहे. या दोघांच्या 'बिग बॉस १५' मध्ये येण्याने घरात ग्लॅमर आणि स्टारडम दोन्हींचा तडका लागणार आहे. त्याचबरोबर या दोघांच्या सहभागाने या दोघांची रियल लाईफ केमेस्ट्रीसुद्धा चाहत्याना पाहायला मिळू शकते. त्यामुळे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. (हे वाचा:Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; PHOTO) तसेच 'बिग बॉस १५' मध्ये नवीन तडका लावण्यात येणार आहे. यावेळी घरामध्ये दाखल होण्यासाठी स्पर्धकांना जंगल पार करावं लागणार आहे. म्हणजेच यावेळी जंगल थीम ठेवण्यात आली आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो समोर आला होता. यामध्ये सलमान खानने हा सीजन स्पर्धकांसाठी टफ असणार असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे यावेळी आपल्याला घरात अभिनेत्री रेखा यांचासुद्धा आवाज ऐकायला मिळणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या